कुपवाड : खबऱ्या प्रतिनिधी / कुपवाड शहरातील बामणोलीकडे जाणाऱ्या बामणोली स्वागत कमानी जवळ अमर उर्फ गुट्ट्या राजू जाधव (वय. ३२) रा.कुपवाड ,ता. मिरज , जि.सांगली या युवकाचा डोक्यात दगड घालून व काही वेळाने मानेवर , पोटावर, सपासप वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. खून करून हल्लेखोर फरारी असल्याचे समजते आहे. घटनास्थळी दोन कोयते पोलिसांना सापडल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , या खुनाच्या कारस्थानामध्ये तीन ते चार हल्लेखोर होते. हल्लेखोरांनी खून का केला..? याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.
या प्रकरणी अधिक तपास एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील करीत आहेत.

