• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

विटा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Admin by Admin
July 15, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनीता सदाशिव काटे (वय ४८, रा. बोबडेवाडी, लेंगरे, ता. खानापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विटा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज मुलाणी (रा. माहुली), विशाल देसाई (रा. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि हिरा नामदेव पवार (रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेंगरे येथील सुनीता काटे यांचा मुलगा सूरज याला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष या तिघांनी दाखवले होते. ८ एप्रिल २०२२ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे त्यांनी सुनीता काटे यांच्याकडून टप्प्या-टप्प्याने पैसे उकळले. यामध्ये विशाल देसाईच्या बँक खात्यावरील ३ लाख रुपये, तर हिरा पवार याच्या खात्यावरील व रोख स्वरूपात १९ लाख २७ हजार ५०० रुपये, असे एकूण २२ लाख २७ हजार ५०० रुपये या तिघांनी संगनमताने घेतले.

पैसे देऊनही बराच कालावधी उलटल्यानंतर सूरजला नोकरी लागली नाही. त्यामुळे सुनीता काटे यांनी आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, संशयितांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच ‘तुला काय करायचे ते कर, आम्ही पैसे देणार नाही. जर पोलिस ठाण्यात तक्रार दिली, तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकीही दिली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनीता काटे यांनी विटा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही संशयितांविरुद्ध फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास हवालदार शांताराम जाधव करत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

Next Post

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

मिरज - शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group