• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

Admin by Admin
July 23, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक, कर्मवीर भाऊराव चौक ते सिव्हिल हॉस्पिटल चौक परिसरातील अनधिकृत गाडे, खोके, स्टॉल्स आणि रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली. या कारवाईमुळे मुख्य रस्ता आणि पदपथ मोकळे झाल्याने वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली. रस्त्यावर उभारलेले गाडे, अतिरिक्त स्टॉल्स तसेच दुकानांसमोर वाढविण्यात आलेल्या फरश्या हटविण्यात आल्या. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले की, संबंधित व्यावसायिकांना गेल्या महिनाभरात चार ते पाच वेळा नोटिसा व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. व्यवसाय केवळ मंजूर जागेतच करावा, पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण करू नये, असे वारंवार सांगूनही अनेकांनी नियमांचे उल्लंघन केले. काही ठिकाणी दुकानांसमोर सुमारे दहा फूट फरश्या टाकून तसेच अतिरिक्त गाड्या व स्टॉल्स उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता.

सिव्हिल चौक व भाऊराव चौक परिसरात यापूर्वीही अनेकदा कारवाई झाली असून काही दिवसांत पुन्हा अतिक्रमणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढेही नियमित कारवाई सुरू राहणार असून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जाणार आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

Previous Post

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

Next Post

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group