• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

Admin by Admin
July 14, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सध्या पंढरीची वारी सुरू असून मानाच्या पालखीसह हजारो दिंड्यांसह लाखो वारकरी पंढरीची वाट चालत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे साताऱ्यात आगमन होत असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. त्यातच, माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत पोलिसांची बनावट वेशभूषा करून नागरिकांना लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावून कारवाईची भीती दाखवत वाहनचालकांकडून पैसे देखील उकळत होते. वर्धनगड येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ सुरू असलेला हा प्रकार गोपनीय माहितीच्या आधारे पुसेगाव पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत चार पुरुष आणि तीन महिलांना अटक करण्यात आली असून दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल, रोख रक्कम असा तब्बल २१ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरीसह पालखी मार्गावरही चोरट्यांवर पोलिसांच्या करडी नजर आहे.

पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक होत असून अटकेतील आरोपींचा अधिक तपास सुरू आहे. यापूर्वी कुठल्या गुन्ह्यात आरोपींचा सहभाग आहे का, त्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस हवालदार योगेश बागल, रेश्मा भोसले, अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, उमेश देशमुख, दऱ्याबा नरळे व चालक तुषार बाबर यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले.

साताऱ्यातून ९७ सराईत गुन्हेगार तडीपार

पंढरीच्या वारीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात पालखी कालावधीत कायदा व सुव्यवस्थेसाठी ९७ गुन्हेगारांना तडीपार (जिल्हा बंदी) करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधात्मक कारवाई राबविण्यात आली आहे.

Previous Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

Next Post

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group