• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यु

Admin by Admin
April 17, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यु
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई येथे काल (ता.१६) महाराष्ट्र भूषण पुरस्कार पार पडला. जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला असून यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. थाटात पार पडलेल्या या सोहळ्याला एका गोष्टीमुळे गालबोट लागले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अनेक लोकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामुळे ११ जणांचा मृत्यु झाला असून १९ जणांवर उपचार सुरू आहेत.

खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या लोकांना उष्माघाताचा त्रास झाला. यातील जवळपास १२५ लोकांनी डिहायड्रेशनची तक्रार केली. सुरुवातीला घटनास्थळी असलेल्या मेडिकल बूथ मध्ये या लोकांना उपचारासाठी न्हेले. यामधील ज्या लोकांना विशेष उपचाराची गरज होती, त्यांना कामोठे येथील एमजी एम रुग्णालयात न्हेण्यात आले.

दरम्यान ११ लोक दगावले असून ८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लोकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार व आदित्य ठाकरे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. खरंतर या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी भरपूर लोक उपस्थित होते. येथे उपस्थित असणारे लोक भर उन्हात हा कार्यक्रम पाहत होते. त्यांच्यासाठी व्यवस्थित सोय करण्यात आली न्हवती. त्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

मोठी ब्रेकींग : कुपवाडमध्ये युवकाचा सपासप वार करून खून ; हल्लेखोर पसार.

Next Post

जनविरोध डावलून टोल सुरू केल्यास नाका फोडणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जनविरोध डावलून टोल सुरू केल्यास नाका फोडणार

जनविरोध डावलून टोल सुरू केल्यास नाका फोडणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group