खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची नसून हि दहशत आहे तड्कडताईची. जेष्ठ महिन्यात आषाडीच्या अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी म्हैशासुर मार्दीनी तड्कड ताईचा वेश घेऊन शहराची रखवाली करण्यासाठी फिरत असते. या तड्कड ताईची दहशत कशी आहे? वाचा..
आरारा खतरनाक..! भुताची आई तडकडताई
अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी हि आहे तड्कडताई. जेष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरवात होते. तडकड ताई, भुताची आई, असा गजर करत लहान मुले या तडकडीचे स्वागत करतात. कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान असतो. ही परंपरा गेल्या २५० वर्षापासून सांगलीत सुरू आहे.
सांगली शहरात जोगण्या उत्सव हा जेष्ठ अमावास्येला संध्याकाळी ४ वाजता सुरु होतो. काळी साडी हातात सूप आणी चेहऱ्याला तडकडीचा मुखवटा अशा वेशात तड्कडीच्या लग्नाची वरात काढण्यात येते. कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे थेट स्मशानात संध्याकाळी ६ वाजता या तडकडताई च्या लग्नासाठी शेकडो आबालवृद्ध हजार असतात, सूर्य अस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षताने तिचा विवाह पार पडतो. विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सुपाने प्रसाद देते. या सुपाचा मार बसला कि मुलांवरील इडा पिडा टळते अशी आख्यायिका आहे.

