• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमधील “त्या” पेट्रोल पंपावर शनिवारी लागली ” साडेसाती “.! कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू ; “द-मा” वाढल्याने होतेय घुसमट..! पेट्रोल पंप “ब्लॅकलिस्ट” मध्ये टाकल्याची माहिती..?

Admin by Admin
April 16, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, विशेष, शैक्षणिक, शोध पत्रकारिता
1 min read
0
प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : गोपनीय खबऱ्या विशेष प्रतिनिधी/ कुपवाड शहरात राज्यातून बऱ्याच मालवाहू गाड्या ये – जा करत असतात. वाहनांची वाढती संख्या पाहून एका बड्या मालकाने पेट्रोल पंप काढला. परंतु, सदरील पेट्रोल पंपावर दिवसा ढवळ्या ग्राहकांची फसवणूक होत असून, शासन नियमाप्रमाणे कोणतीही सुविधा न देता राजरोसपणे आर्थिक लुबाडणूक होत असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली.

याचा परिणाम असा की, शनिवारी दिवसभर कुपवाड व परिसरातील नागरिकांनी पेट्रोल पंपावर तेल न टाकण्याचा निर्णय घेतला. गोपनीय खबऱ्याने जनहिताची भूमिका घेत वार्तांकन केले. आणि रोज फसणारे ग्राहक जागृत झाले. बातमीचा परिणाम एव्हढा झाला की, अक्षरशः ग्राहकांनी त्या पेट्रोल पंपावर तेल टाकणे नाकारले. केवळ आपली दुकानदारी चालावी यासाठी “दलींदर” प्रवृत्तीच्या बांडगुळ किड्याने मोफत सल्ला केंद्र सुरू केले. फुकटचा तो चुकीचा सल्ला मात्र खूपच भारी पडला असून , वरिष्ठांकडून पेट्रोल पंप बंद करण्याची दाट शक्यता असल्याचे नियमातून दिसून येत आहे.

पेट्रोल पंपाच्या या कारभाराचा लेखाजोखा खबऱ्या मांडत असून, कुपवाड मधील लोकप्रतिनिधी – नगरसेवक, व्यापारी संघटना, गाळेधारक, युवक मंडळे, महिला वर्ग, कामगार वर्ग यांनी खबऱ्याला पाठिंबा देत आम्ही आपल्या सोबत आहोत, असे म्हणत सह्यांची मोहीम राबवत खबऱ्याकडे अर्ज सादर केले आहेत.

जनहितासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वच सहकाऱ्यांचे खबऱ्याकडून कौतुक होत आहे.तर गैर कारभाराविरोधात कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रेकॉर्ड हालचाली सुरू केल्याचे समजते आहे. दिवसभर होणाऱ्या बातमीची चर्चा गल्ली बोळात मोठ्या चवीने रंगली, आणि हुशार जनतेने आपली होत असलेली फसवणूक थांबवल्या प्रकरणी गोपनीय खबऱ्याचे आभार मानले.

परंतु, काही संघटना समाजहितासाठी “हा मोठा प्रश्न आहे” म्हणत आक्रमक झाल्या, तर काही समाजसेवक मात्र केवळ तोडपाणी करण्यासाठी आपल्या संघटनेचा वापर करीत असल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

गोपनीय खबऱ्याने शनिवारी दिवसभर अधिक माहिती घेतली, तेव्हा संबंधित पेट्रोल पंप “ब्लॅकलिस्ट” मध्ये टाकल्याची माहिती मिळाली.

या भलत्या प्रकारामुळे कुपवाडकर जनता मात्र संतप्त असून , शनिवारी ग्राहकांकडून पेट्रोल पंपाच्या कारभाराविरोधात नाराजी दिसून आल्याने, शनिवारी पेट्रोल पंपाला मात्र “साडेसाती” लागल्याचे बोलले जात आहे.

“गोपनीय खबऱ्या” वरती वाचकांचा विश्वास..

गोपनीय खबऱ्या लाईव्ह व पोर्टल हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट, सर्वप्रथम बातम्या देणारे प्रसिध्दी माध्यम आहे. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची असलेला गोपनीय खबऱ्या हा कोट्यावधी वाचकांच्या कुटुंबाचा सखा अन् सत्याचा पाठीराखा आहे. बेधडक – निर्भिड असलेला गोपनीय खबऱ्या हा अनेकांच्या पोटातील ओठांवर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करतो.

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही, तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल. छापून यावी अथवा दाखवावी वाटते ती जाहिरात असते. आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न आहे. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे. त्यामुळेच वाचकांच्या विश्वासास पात्र ठरलेला गोपनीय खबऱ्या सर्वांच्या मनावरती अधिराज्य करीत आहे.

Previous Post

पत्रकारांशी बोलत असताना अचानक गँगस्टर अतिकच्या डोक्यात बसली गोळी; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ.

Next Post

कुपवाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ; तर शहर संघर्ष समितीच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण संपन्न.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ; तर शहर संघर्ष समितीच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण संपन्न.

कुपवाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ; तर शहर संघर्ष समितीच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण संपन्न.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group