• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

Admin by Admin
July 15, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी उच्छाद मांडला. एकाच गल्लीतील तीन घरे फोडून सुमारे १३ लाखांचा ऐवज लंपास केला. धक्कादायक बाब म्हणजे, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नितीन बाबर यांच्या घराचाही समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसाचेच घर सुरक्षित नसल्याने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पाच ते सहाजणांच्या टोळीने माळवाडी भागाला लक्ष्य केले. स.पो.नि बाबर हे सांगलीत कार्यरत असल्याने, त्यांना घरी येण्यास उशीर होणार होता. आई-वडिलांची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी घराला कुलूप लावून चावी खिडकीत ठेवण्यास सांगितली होती व आई-वडील वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले होते.

बाबर कामानिमित्त येऊ शकले नाहीत, याचाच गैरफायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि कपाटातील ११ तोळे सोने, चांदी आणि रोख ७ हजार रुपये असा ऐवज लंपास केला.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

Next Post

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group