खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र सरकार आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये एक मसुदा सरकारला दिला आहे. २० ते २५ एफआयआर सरकारने मागे घेण्याची आणि आमच्यासोबत शेअर करण्याची मान्य केलं आहे. गुन्हे मागे घेण्याचं मान्य केलं आहे, त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांची संध्याकाळी बैठक पार पडली. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
“मागील ३६ दिवसांपासून आंदोलन करत आहोत. विद्यार्थ्यांवर जे काही गुन्हे दाखल झाले आहे, आंदोलकांवर जे काही गुन्हे दाखल झाले आहे. ते गुन्हे मागे घेतले पाहिजे. मयत विद्यार्थ्यांच्या पालकांना १ कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. आमची पहिली मागणी मान्य झाली. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. आता दिल्ली आणि देशभरामध्ये विद्यार्थ्यांवर आमि आंदोलकांवर जे काही गुन्हे दाखल आहे, ते गुन्हे मागे घेण्याचं सरकारने कबूल केलं आहे. सगळ्या राज्यातील गुन्हे मागे घेतले जाणार आहे. आम्ही एक मसुदा सरकारला दिला आहे. २० ते २५ एफआयआर सरकारने मागे घेण्याची आणि आमच्यासोबत शेअर करण्याची मान्य केलं आहे. गुन्हे मागे घेण्याचं मान्य केलं आहे, असं सीजेपीचे प्रवक्ते रांका यांनी सांगितलं.
सरकार सगळे गुन्हे मागे घेणार
“भविष्यात कोणताही कारवाई होणार नाही, कोणत्याही आंदोलकावर गुन्हे दाखल होणार नाही, सीजेपीच्या आंदोलकांवर कोणतीही कारवाई होणार नाही. आम्ही सरकारला एक मसुदा दिला आहे. सरकार आम्हाला लेखी मंगळवारपर्यंत माहिती देणार आहे. नीट परीक्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या पालकांना १ कोटी रुपयांचा मदतनिधी दिला जाणार आहे, यासाठी मदतनिधी कशा प्रकारे दिला जाणार आहे, याबद्दल सांगितलं जाईल, असंही सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सांगितलं.

