• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | जोतिबाच्या दर्शनावरून परतताना सादळे-मादळे घाटात अपघात; ३ जखमी

Admin by Admin
May 25, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | जोतिबाच्या दर्शनावरून परतताना सादळे-मादळे घाटात अपघात; ३ जखमी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जोतिबाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची महिंद्रा पिकअप सादळे-मादळे (ता. करवीर) घाटातील दुसऱ्या वळणावर पलटी झाली. रविवारी सादळेकडून कासारवाडीमार्गे पुणे-बंगळूर महामार्गावर जाताना हा अपघात झाला.यात चालकासह तिघेजण जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील चौघेजण शनिवारी रात्री जोतिबाच्या दर्शनासाठी महिंद्रा पिकप घेऊन आले होते. रविवारी सकाळी जोतिबाचे दर्शन घेऊन मंगळवेढ्याकडे परत जाताना सादळे-मादळे येथील घाटातील जुने जिनिसेस कॉलेजच्या वळणावर यु आकाराच्या वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी पलटी होऊन बाजूच्या कंपाऊंडवर अडकली. यातील चालकासह तिघेजण जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक प्रवाशांनी व पर्यटकांनी गाडीतून जखमींना बाहेर काढले.

या वळणावर अनेक अपघात

मागील दोन वर्षात घाटातील या वळणावर अनेक अपघात झाले आहेत. ट्रॅक्टर चालक, दुचाकी स्वारांनी आपला जीव गमावला आहे.

घाटातील वळणांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रलंबित

घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. आत्तापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. येथील घाट रस्त्यावर सुरक्षा कठड्यांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. प्रशासनाला अजून किती जणांचे जीव हवे आहेत, असा प्रश्न वाहनचालकांमधून उपस्थित होत आहे.

Previous Post

मंत्र्यांच्या ‘पीए’ला सांगलीतून फोन? भांडी घेऊन जा,म्हणत दिली ऑफर : मंत्री संजय शिरसाठांनी बॉम्ब फोडला.!

Next Post

ब्रेकिंग | खुनाच्या घटनेने एमआयडीसीत खळबळ : कुपवाड- मिरज रस्त्यालगत एकास चाकूने भोकसले.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | खुनाच्या घटनेने एमआयडीसीत खळबळ : कुपवाड- मिरज रस्त्यालगत एकास चाकूने भोकसले.?

ब्रेकिंग | खुनाच्या घटनेने एमआयडीसीत खळबळ : कुपवाड- मिरज रस्त्यालगत एकास चाकूने भोकसले.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group