• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | खुनाच्या घटनेने एमआयडीसीत खळबळ : कुपवाड- मिरज रस्त्यालगत एकास चाकूने भोकसले.?

Admin by Admin
May 26, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | खुनाच्या घटनेने एमआयडीसीत खळबळ : कुपवाड- मिरज रस्त्यालगत एकास चाकूने भोकसले.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली जिल्ह्यात चालू वर्षात खुनाची मालिका सुरूच आहे. कुपवाड एमआयडीसी परिसरातील मेनन पिस्टन चौकात महिन्याभरापूर्वी खून झाला होता. तोपर्यंत मिरज एमआयडीसीत खून झाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालय इमारतीचे उद्घाटन होऊन ३ दिवस झाले. पोलिस यंत्रणा जबाबदारीने कामाचा श्रीगणेशा करणार आहे. तोपर्यंत मिरज एमआयडीसीतील सह्याद्री स्टार्च या कंपनीच्या पाठीमागील परिसरात असणाऱ्या शिवशक्तीनगर भागात एकाचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना समोर आली आहे.

प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, मिरज कुपवाड रस्त्यालगत असणाऱ्या शिवशक्ती नगर परिसरात एकाचा चाकूने भोगसून खून केला आहे. यामध्ये श्रवणेशनाथ महावीर चौगुले (वय २९ रा.भोसे,ता.मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री बाराच्या दरम्यान घडली. खून करून मारेकरी फरार आहेत. खुनाचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मयत श्रवणेशनाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केला. मदत कार्यासाठी आयुष हेल्पलाइनचे टीम प्रमुख अविनाश पवार, चिंतामणी पवार, अभिषेक आंबे हे होते. याबाबत अधिक तपास कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व त्यांची टीम करीत आहे.

Previous Post

ब्रेकिंग | जोतिबाच्या दर्शनावरून परतताना सादळे-मादळे घाटात अपघात; ३ जखमी

Next Post

पूर्व भागातील पदाधिकारी महिलेकडून नवऱ्याची व त्याच्या रखेलीची यथेच्छ धुलाई ?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पूर्व भागातील पदाधिकारी महिलेकडून नवऱ्याची व त्याच्या रखेलीची यथेच्छ धुलाई ?

पूर्व भागातील पदाधिकारी महिलेकडून नवऱ्याची व त्याच्या रखेलीची यथेच्छ धुलाई ?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group