• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मंत्र्यांच्या ‘पीए’ला सांगलीतून फोन? भांडी घेऊन जा,म्हणत दिली ऑफर : मंत्री संजय शिरसाठांनी बॉम्ब फोडला.!

Admin by Admin
May 25, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, विशेष, सामाजिक
1 min read
0
मंत्र्यांच्या ‘पीए’ला सांगलीतून फोन? भांडी घेऊन जा,म्हणत दिली ऑफर : मंत्री संजय शिरसाठांनी बॉम्ब फोडला.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘आश्‍चर्यच आहे ! माझ्या पीएला भांडे घेण्यासाठी सांगलीहून फोन? मंत्री संजय शिरसाट यांनी बॉम्ब फोडला..!

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वेगवेगळी प्रकरणे, घोटाळे बाहेर येण्यासाठी सुरुवात झाली आहे. अशाच एका प्रकरणात मंत्री संजय शिरसाठ यांच्या पीए’ला चक्क भांडी घेऊन जाण्यासाठी सांगलीहून फोन आला असल्याचे पत्रकार परिषदेत बोलून दाखवले.

‘माझा पीए छत्रपती संभाजीनगरचा त्याला सांगलीवरून फोन आलाय. तुमचे भांडे आलेत ते भांडे घेऊन जा. सांगली कुठे छत्रपती संभाजीनगर कुठे. कामगारांना संसारोपयोगी साहीत्य वाटपात राज्यभरात घोटाळा झालाय.

बोगस याद्या बनवून हा सगळा प्रकार सुरुय. या योजनेची केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची नव्हे तर राज्यभरातील सर्व गैरप्रकाराची एआयटी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

शहरात माध्यमांशी संवाद साधताना रविवारी (ता. २५) ते म्हणाले, महाराष्‍ट्र घरेलू कामगार महामंडळाअंतर्गत शासनाची कामगारांना मदत करण्यासाठी संसारोपयोगी साहित्य देण्याची भूमिका होती. त्यात प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतोय. याचे प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे. लाभार्थी सोडाच इतरांची नावे अॅड करणे.

यात अधिकाऱ्यांसह एजंट आहे. एआयटी चौकशी झाली पाहीजे. छत्रपती संभाजीनगर मध्ये एक एजंटचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यातील दोषींना जेलमध्ये टाकले पाहीजे. माझ्याकडे तक्रारी आल्या. त्यात चौकशी करायला लावली. कोणत्याही गोडावून मधून हे साहित्य पुरवले जाते. यात एजंट लोकांमार्फत हा मोठा घोटाळा सुरू आहे. यात कोट्यावधींचा भ्रष्टाराचार झालाय. बोगस नावे अॅड करून त्यांच्याकडून दोन ते चार हजार रुपये घेण्याचे काम सर्रास सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार आहे. असे मंत्री शिरसाट म्हणाले.

पोलीस दलातून चोरटे, दरोडेखोरांना मदत ?

छत्रपती संभाजीनगरात जे दरोडे, घरफोडी, चोऱ्या झाल्या. हे जे दरोडे, छोटे मोठे चोर आहेत त्यांना काही पोलीस विभागातील काही लोक सहकार्य करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्या दृष्टीने पोलीस आयुक्तांनी तपास करावा. एका दिवसात चोर आले नाहीत. ही एक साखळी आहे. ती शोधून काढण्याच्या सुचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. असे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले. पंधरा दिवसांपुर्वी शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शहर पोलीस दलाचे वाभाडे काढले होते. त्यानंतरही लागोपाट तीन दरोडे पडले. तसेच चोऱ्यांची संख्याही वाढली. त्यामुळे आज शिरसाट यांनी पुन्हा एकदा पोलीसांना निशान्यावर घेतले.

स्थानिक पातळीवर युतीचा प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर युती व्हावी यासाठी शिवसेना सकारात्मक आहे. ‘आम्ही युती करण्याच्या मनःस्थितीत आहोत. युती व्हावी असा आमचा मनोदय आहे’ असे मंत्री शिरसाट म्हणाले.

Previous Post

सांगली | शाळकरी मुलीचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग

Next Post

ब्रेकिंग | जोतिबाच्या दर्शनावरून परतताना सादळे-मादळे घाटात अपघात; ३ जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | जोतिबाच्या दर्शनावरून परतताना सादळे-मादळे घाटात अपघात; ३ जखमी

ब्रेकिंग | जोतिबाच्या दर्शनावरून परतताना सादळे-मादळे घाटात अपघात; ३ जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group