• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | शाळकरी मुलीचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग

Admin by Admin
May 25, 2025
in क्राईम
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली शहरातील उपनगरात राहणार्‍या एका शाळकरी मुलीचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग करून घराच्या दरवाजावर लाथा मारून तिला व आईला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. याबाबत पीडितेच्या आईने संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशुतोष दीपक मोहिते (रा. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, पीडित मुलगी शहरातील एका उपनगरात राहते. गेल्या काही दिवसापासून संशयित आशुतोष तिचा पाठलाग करत होता. दि. 22 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पीडिता सायकल घेऊन दूध आणण्यासाठी निघाली होती. ती घराबाहेर येताच तिला आशुतोष दिसला. तिने घाबरून सायकल जागेवरच लावून घराचा दरवाजा बंद करून घेतला. तोपर्यंत आशुतोष तिथे आला. त्याने दारातूनच पीडित मुलीला, ‘मी तुला सोडणार नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझा मोबाईल नंबर दे, नाही तर मी जीव देईन’, अशी धमकी दिली. तिने दरवाजा बंद केल्यामुळे आशुतोषने दरवाजावर जोरजोरात लाथा मारल्या.

दरवाजा न उघडल्याने पीडितेला व तिच्या आईला शिवीगाळ करून तो तेथून निघून गेला. याबाबत पीडितेच्या आईने शुक्रवारी सायंकाळी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आशुतोष याच्यावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

ब्रेकिंग | महावितरण ‘हाय अलर्ट’वर ;अधिकाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचा आदेश

Next Post

मंत्र्यांच्या ‘पीए’ला सांगलीतून फोन? भांडी घेऊन जा,म्हणत दिली ऑफर : मंत्री संजय शिरसाठांनी बॉम्ब फोडला.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मंत्र्यांच्या ‘पीए’ला सांगलीतून फोन? भांडी घेऊन जा,म्हणत दिली ऑफर : मंत्री संजय शिरसाठांनी बॉम्ब फोडला.!

मंत्र्यांच्या 'पीए'ला सांगलीतून फोन? भांडी घेऊन जा,म्हणत दिली ऑफर : मंत्री संजय शिरसाठांनी बॉम्ब फोडला.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group