सर्वपक्षीय तिरंगा पदयात्रेस कुपवाडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या – पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्यात भारतीय सेनेने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये तीनही सैन्य दलांच्या शूर कामगिरीच्या गौरवार्थ,त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, कुपवाड शहरात मंगळवारी सकाळी प्रमुख मार्गावरून सर्वपक्षीय तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या तिरंगा यात्रेत माजी सैनिक संघटना, शहरातील विविध संघटना सर्व पक्षीय संघटना सहभागी झाल्या होत्या.या रॅलीत माजी सैनिक, युवक, युवती,महिला,ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला.
काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आंतकवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर देत पाकचे कुटील मनसुबे धुळीस मिळवले. सीमेवर रक्षण करणारे व देशासाठी प्राण पणाला लावून लढणारे भारतीय जवान, देशाचे संपूर्ण सैन्यदल यांचा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला अभिमान असून या जवानांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या पराक्रमाचे कौतुक, सन्मान व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभक्तीपर गीते, वाद्यवृंद,गणवेशात असलेले माजी सैनिक आणि हाती तिरंगा घेतलेले असंख्य राष्ट्रप्रेमी नागरिकांनी ‘वंदे मातरम्, ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा सोसायटी चौकातून मुख्य रस्त्यावरील संत रोहिदास चौक, थोरला गणपती चौक ते गावचावडी ,जैन गल्ली पासून पुन्हा सोसायटी चौकात येवून समारोप करण्यात आला. या तिरंगा पदयात्रेच्या समारोप प्रसंगी पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या भारतीय पर्यटकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
या तिरंगा यात्रेत माजी सैनिक ,माजी नगरसेवक प्रकाश ढंग, राजेंद्र कुंभार, गजानन मगदुम, शेडजी मोहिते, महेंद्र पाटील, सनी धोतरे,अनिल कवठेकर, राजेंद्र पवार, महावीर पाटील, प्रवीण कोकरे, दर्गाह सरपंच ऐनुद्दीन मुजावर, बशीर मुजावर, दिनकर चव्हाण, अख्तरहुसेन मुजावर,दीपक चव्हाण,अरुण रूपनर, प्रकाश व्हनकडे, प्रणव पाटील, झाकीर मुजावर, अबुखैर मुजावर, बिरू आस्की, विजय खोत, श्रीधर अपराध, आशुतोष धोतरे, अमोल कदम, भाजपा महिला आघाडीच्या गंगूताई नाईक, ललिता मासाळ, सुनिता रुपनर, ललिता कांबळे यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

