• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मंत्रिमंडळात छगन भुजबळांची एन्ट्री, कोण होणार नाशिकचा पालकमंत्री ?

Admin by Admin
May 20, 2025
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मंत्रिमंडळात छगन भुजबळांची एन्ट्री, कोण होणार नाशिकचा पालकमंत्री ?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

नाशिकचा पालकमंत्री कोण होणार? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. याचं कारण आहे छगन भुजबळांनी घेतलेली मंत्रिपदाची शपथ. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी छगन भुजबळांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्रिपदाची चर्चा सुरू झालीय. गिरीश महाजन, दादा भुसेंनंतर आता छगन भुजबळ देखील पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत असणार आहे. कारण गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रिपद दिल्यानंतर शिवसेना तसंच राष्ट्रवादीकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे रायगडसह नाशिकचं पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती.

मात्र, भुजबळांच्या शपथविधीनंतर भुजबळांना नाशिकचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वाद सुरुय. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हा निर्णय कधी मार्गी लागणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. त्यात आता भुजबळांना मंत्रिपद दिल्यानंतर पालकमंत्रिपदावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

झी २४ तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी महिन्याभरात पालकमंत्रिपदाचा तोडगा निघणार असल्याचं म्हटलं होतं. तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे अडचणी निर्माण होतात असं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.छगन भुजबळ मंत्री होण्याअगोदर दादा भुसे आणि गिरीश महाजनच रेसमध्ये होते. मात्र, आता भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात परतल्यामुळे ते देखील पालकमंत्रिपदाच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. तसंच देवेंद्र फडणवीसांनी महिन्याभरात पालकमंत्रिपदावर तोडगा निघणार असं म्हटलं होतं. त्यामुळे छगन भुजबळांसाठी महायुती थांबली होती. असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय.

Previous Post

ब्रेकिंग! सोलापूरच्या ‘महावितरण’मधील तिघे लाचलुचपतच्या जाळ्यात; कंत्राटी कर्मचाऱ्याने साहेबांसाठी घेतली आठ हजाराची लाच; ‘या’ दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा

Next Post

सांगली | धक्कादायक प्रकार : आर्थिक वादातून खून, आरोपीच्या आईने केली आत्महत्या.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | धक्कादायक प्रकार : आर्थिक वादातून खून, आरोपीच्या आईने केली आत्महत्या.?

सांगली | धक्कादायक प्रकार : आर्थिक वादातून खून, आरोपीच्या आईने केली आत्महत्या.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group