• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गांधारी पुलावरील विचित्र घटना , महिलेचा मृत्यू तर १ जखमी, तब्बल २० फुटांचा कठडा तोडून डंपर थेट नदीत.!

Admin by Admin
May 20, 2025
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
गांधारी पुलावरील विचित्र घटना , महिलेचा मृत्यू तर १ जखमी, तब्बल २० फुटांचा कठडा तोडून डंपर थेट नदीत.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कल्याण प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कल्याणकरांसाठी आजची सकाळ अतिशय भयानक अशी ठरली. गांधारी पुलावर भरधाव वेगात आलेल्या डंपरने रिक्षाला धडक देऊन झालेल्या विचित्र अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर रिक्षाचालक जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गांधारी पुलाचा तब्बल २० फुटापर्यंतचा कठडा तोडून डंपर थेट नदीमध्ये कोसळला. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

सकाळी सहा ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास ही रिक्षा बापगावकडून कल्याणच्या दिशेला येत होती. तर हा ट्रक अतिशय भरधाव वेगाने कल्याणकडून बापगावकडे येत होता. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये डंपरचालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या रिक्षेला त्याने जोरदार धडक दिली. आणि कोणाला काही कळायच्या आतच पुलाचा कठडा तोडून हा डंपर थेट नदीमध्ये जाऊन कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

तर या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पुलावरून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती कळवली. त्यानूसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता समोरचे दृश्य पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला. रिक्षेच्या पुढच्या भागाचा पूर्ण चक्काचूर झाला होता.

या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून रिक्षाचालकही जखमी झाल्याचे समजते. तर नदीमध्ये पडलेल्या डंपरमध्ये चालकासोबत आणखी कोण होते की नाही याचीही माहिती समजू शकलेली नाही.

Previous Post

ब्रेकिंग | दरड कोसळून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Next Post

साताऱ्यात पावसाचा हाहाकार; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
साताऱ्यात पावसाचा हाहाकार; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला

साताऱ्यात पावसाचा हाहाकार; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group