• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | दरड कोसळून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

तेजस जनशताब्दी एक्सप्रेससह सहा एक्सप्रेस गाड्या विविध स्थानकांवर थांबवल्या

Admin by Admin
May 20, 2025
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | दरड कोसळून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

  • वाहतूक पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न 

कोकण रेल्वे मार्गावर विलवडे तसेच वेरवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वा.च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेससह जवळपास सहा एक्स्प्रेस गाड्यांना फटका बसला या घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेची आपत्कालीन टीम घटनास्थळी रवाना झाली. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मंगळवारी दुपारपासून रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच कोकण रेल्वे मार्गावर विलवडे ते वेरवली दरम्यान मांडवकरवाडी येथील रेल्वे बोगद्यासमोर दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक थांबवावी लागली. मडगांव ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस दुर्घटनाग्रस्त भागातून निघून गेल्यानंतर दरड कोसळली. सायंकाळी पावणेसहा वा.च्या सुमारास दरड कोसळल्याचे लक्षात येताच या मार्गावरून धावणार्‍या गाड्या त्या त्या ठिकाणी थांबवण्यात आल्या. थांबवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये मडगांव, मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगांव, मुंबई तेजस एक्स्प्रेस, एर्नाकुलम पुणे, सुपरफास्ट एक्स्प्रेस, मडगांव, मुंबई कोकण कन्या एक्स्प्रेस तसेच मुंबईकडे जाणारी मत्स्यगंधा मडगांव, मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस या मडगांव, मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस गाड्या खारेपाटण ते मडगांव दरम्यान विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या. मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस मात्र, घटनास्थळावरून वेळीच निघून गेल्याने तिला या दुर्घटनेचा फटका बसला नाही.

Previous Post

सांगली | महायुतीत दोस्तीत कुस्ती..! आमदार इद्रिसभाईच लावताहेत भाजपला गळती..?

Next Post

गांधारी पुलावरील विचित्र घटना , महिलेचा मृत्यू तर १ जखमी, तब्बल २० फुटांचा कठडा तोडून डंपर थेट नदीत.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गांधारी पुलावरील विचित्र घटना , महिलेचा मृत्यू तर १ जखमी, तब्बल २० फुटांचा कठडा तोडून डंपर थेट नदीत.!

गांधारी पुलावरील विचित्र घटना , महिलेचा मृत्यू तर १ जखमी, तब्बल २० फुटांचा कठडा तोडून डंपर थेट नदीत.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group