Friday, June 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

साताऱ्यात पावसाचा हाहाकार; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला

Admin by Admin
May 20, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
साताऱ्यात पावसाचा हाहाकार; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सातारा जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरूच असून सातारा शहरात तर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही मेघगर्जनेसह पाऊस पडला. यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित झाला. तर शहराजवळीलच यवतेश्वर घाटात वादळामुळे मोबाईल टाॅवर कोसळला.यामध्ये एकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता.

एप्रिल महिना कडक उन्हाचा ठरला होता. पण, मे महिन्यात सतत वादळासह पाऊस होत आहे. यामुळे पारा एकदम कमी झाला आहे. त्यातच मागील काही दिवसांत सातारा शहराचे तापमान ३५ अंशाच्या खाली कायम आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता नाही. पण, काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे. अशातच चार दिवसांपासून जिल्ह्यात वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारीही सातारा शहरासह परिसरात जोरदार पाऊस पडला.

सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास साताऱ्यात पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटात जवळपास ३० मिनिटे पावसाने हजेरी लावली. यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. तसेच रस्त्याच्या बाजूची गटारेही भरून वाहत होती. मात्र, सखल भागात पाणी साचले. यामुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागली. त्यातच शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, सायंकाळी सवा सहानंतरही पुन्हा पाऊस सुरू झाला. पण, यावेळी जोरदार वारे वाहत होते. या वाऱ्यातच शहराजवळील यवतेश्वर घाटात मोबाइल टाॅवर रस्त्यावरच कोसळला. यामध्ये वाहनावरील एकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली. तसेच टाॅवर रस्त्यावरच पडल्याने वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. दोन्ही बाजुंनी वाहने थांबून होती.

Previous Post

गांधारी पुलावरील विचित्र घटना , महिलेचा मृत्यू तर १ जखमी, तब्बल २० फुटांचा कठडा तोडून डंपर थेट नदीत.!

Next Post

दरड कोसळून खोळंबलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दरड कोसळून खोळंबलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरू

दरड कोसळून खोळंबलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरू

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014