• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘खाकी’ने धुतली ‘खाकी’.. यात उरली फक्त बाकी..! इचलकरंजीतील ‘शहापूर’चा हवालदार निलंबित

Admin by Admin
May 18, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
‘खाकी’ने धुतली ‘खाकी’.. यात उरली फक्त बाकी..! इचलकरंजीतील ‘शहापूर’चा हवालदार निलंबित
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

एसटी चालकास धू धुतल्यानंतर व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शहापूर पोलिस ठाण्याचा हवालदार असिफ महंमद कलायगार याला शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले. याबाबतचा आदेश अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी दिला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली.

मारहाण प्रकरण मिटवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र कोणासही दाद न देता अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल करून अटक करीत निलंबनाची कारवाई केल्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

असिफ हा पत्नी हाफिबा यांच्यासोबत चारचाकीतून बोरपाडळे मार्गावरून येत होता. एसटीला बराच वेळ वाट दिली नसल्याच्या कारणावरून चालकाने विचारल्यावर असिफने शिवीगाळ करून चालकाच्या कानशिलात लगावली व गळपट्टी धरून मारहाण केली होती. तसेच मी पोलिस आहे, तुला विनयभंगाच्या केसमध्ये अडकवीन, माझी वरपर्यंत ओळख आहे, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नी हाफिबा यांनीही शिवीगाळ करून हातात चप्पल घेऊन मारहाण करून धमकी दिली होती. याबाबतचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. एसटी कर्मचारी संघटनेने गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरल्याने असिफ व त्याची पत्नी हाफिबा (रा. इचलकरंजी) यांच्याविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक केली होती. असिफच्या अशोभनीय गैरवर्तणुकीमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. या कारणास्तव अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी असिफ यास शासकीय सेवेतून निलंबित करीत असल्याचे आदेश दिले. निलंबन काळात त्याने पोलिस मुख्यालयाला दररोज हजेरी देणे बंधनकारक आहे.

Previous Post

दमदार नेते मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा

Next Post

मोठी ब्रेकिंग | मद्यधुंद ट्रक चालकाची मागून धडक, लोकवर्गणीतून दिलेल्या रविकांत तुपकरांच्या ‘लोकरथ’ गाडीचा अपघात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | मद्यधुंद ट्रक चालकाची मागून धडक, लोकवर्गणीतून दिलेल्या रविकांत तुपकरांच्या ‘लोकरथ’ गाडीचा अपघात

मोठी ब्रेकिंग | मद्यधुंद ट्रक चालकाची मागून धडक, लोकवर्गणीतून दिलेल्या रविकांत तुपकरांच्या 'लोकरथ' गाडीचा अपघात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group