• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | मद्यधुंद ट्रक चालकाची मागून धडक, लोकवर्गणीतून दिलेल्या रविकांत तुपकरांच्या ‘लोकरथ’ गाडीचा अपघात

Admin by Admin
May 18, 2025
in क्राईम, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | मद्यधुंद ट्रक चालकाची मागून धडक, लोकवर्गणीतून दिलेल्या रविकांत तुपकरांच्या ‘लोकरथ’ गाडीचा अपघात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सध्या कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला.

मद्यधुंद अवस्थेतील ट्रक ड्राइव्हरने भरधाव ट्रकने इनोव्हाला मागून धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी तथा गंभीर दुखापत झाली नाही. गाडीतील दोघांना किरकोळ मार लागला आहे.

रविकांत तुपकर यांना लोकवर्गणीतून लोकांनी दिलेली ‘लोकरथ’ नामक इनोव्हा (क्रमांक MH 28 BQ 9999) पारगाव टोल नाक्यावर थांबलेली असताना मागून भरधाव वेगात आलेल्या साखरेने भरलेल्या ट्रकने (MH 44 U 1444) गाडीला जोरदार धडक दिली. ट्रकचालक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. या धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. गाडीतील मागील सीटवर बसलेले लोक अक्षरशः समोर फेकले गेले. या अपघातात सुदैवाने रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णतः सुरक्षित आहेत. मात्र, गाडीत त्यांच्यासोबत असलेले पीए कार्तिक सवडतकर आणि राजाराम जाधव यांना सौम्य मार लागला आहे. तर चालक अजय मालगे व तुपकरांचे सहकारी गजानन नाईकवाडे यांना कोणतीही दुखापत नाही.

ट्रकचालक हा दारूच्या नशेत होता, अपघातानंतर तो सारखे खोटे बोलत होता व माहिती लपवण्याचा प्रयत्न करत होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून चालकासह ट्रकमधील क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून साखरेनं भरलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न? याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

रविकांत तुपकर हे राज्यात कर्जमुक्ती मागणीच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी नाशिक, परभणी, बीड येथील दौरे पूर्ण केले असून काल अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे ‘कर्जमुक्ती एल्गार सभेला संबोधित केले. सभा आटोपून त्यांनी लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन घेतलं व त्यानंतर रात्री ११ वाजता जालन्याच्या दिशेने ते मार्गस्थ झाले असताना वाशीजवळ हा अपघात घडला.

या अपघातामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, तुपकर हे पूर्णतः सुरक्षित असल्याचं समजताच सर्व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित यंत्रणांकडून सखोल व सर्व बाजूंनी चौकशी व्हावी अशी मागणी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. ट्रकचालक संभाजी डोंगरे (पंढरपूर) याच्यावर वाशी पोलीस स्टेशनला कलम २८१,कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कायदेशीर प्रक्रिया सकाळी ५ वाजेपर्यंत चालू होती.

Previous Post

‘खाकी’ने धुतली ‘खाकी’.. यात उरली फक्त बाकी..! इचलकरंजीतील ‘शहापूर’चा हवालदार निलंबित

Next Post

सांगली | महायुतीत दोस्तीत कुस्ती..! आमदार इद्रिसभाईच लावताहेत भाजपला गळती..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | महायुतीत दोस्तीत कुस्ती..! आमदार इद्रिसभाईच लावताहेत भाजपला गळती..?

सांगली | महायुतीत दोस्तीत कुस्ती..! आमदार इद्रिसभाईच लावताहेत भाजपला गळती..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group