• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | व्यावसायिकाची ४५ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

Admin by Admin
May 16, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पवनचक्की विक्रीच्या व्यवहारात सांगलीतील एका व्यावसायिकाची 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी घाटकोपर मुंबई येथील दाम्पत्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दत्तात्रय मुसळे आणि वैशाली दत्तात्रय मुसळे (दोघेही रा. राजश्री प्लाझा सिनेमा टॉकीजनजीक, एलबीएस मार्ग, घाटकोपर, मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत.

ही घटना मार्च 2016 ते सप्टेंबर 2016 यादरम्यान घडली. याबाबत शरद ज्ञानोबा खराडे (रा. योग बंगला, नागराज कॉलनी, विश्रामबाग, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी खराडे स्थापत्य अभियंता आहेत. संशयित मुसळे दाम्पत्याने त्यांच्याशी संपर्क साधला. संशयितांनी सातारा जिल्ह्यातील वरुड (ता. खटाव) येथे गट क्रमांक 692 आणि औंध येथे गट क्रमांक 21 या दोन ठिकाणी विनकॉन कंपनीच्या दोन पवनचक्क्या मालकीच्या असल्याचे सांगितले. या दोन्ही पवनचक्क्या विकायच्या असून त्यासाठी 51 लाख रुपये रक्कम निश्चित केली. या पवनचक्क्या हस्तांतरणाबाबत वाद असल्याची माहिती त्यांनी खराडे यांच्यापासून लपवून ठेवली. याबाबत काही माहिती नसल्याने खराडे यांनी संशयित दाम्पत्यास 45 लाख रुपये दिले. आता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खराडे यांनी विश्रामबाग पोलिसांत धाव घेतली.

Previous Post

मातोश्री तानुबाई दगडू खाडे स्कूलचा निकाल १०० टक्के 

Next Post

नवकृष्णा व्हॅली स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नवकृष्णा व्हॅली स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल.

नवकृष्णा व्हॅली स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group