• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खंडेराजुरीतील प्रज्वल रूपनूर युद्धासाठी रवाना, तीन पिढ्या देशसेवेसाठी कार्यरत ..!

Admin by Admin
May 10, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
1 min read
0
खंडेराजुरीतील प्रज्वल रूपनूर युद्धासाठी रवाना, तीन पिढ्या देशसेवेसाठी कार्यरत ..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सुट्टीवर आले, लग्न झाले… अन् ऑपरेशन सिंदूरसाठी बोलावणं आले..!

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी गावचे सुपुत्र प्रज्वल रूपनूर हे गुजरात सीमेवरील ‘भुज’ येथे सीमा सुरक्षेसाठी रवाना झाले असून त्यांना गावकऱ्यांकडून साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.

अवघ्या २४ वर्षाचे खंडेराजुरीचे सुपुत्र प्रज्वल हिम्मतराव रूपनूर भारतीय सेनेत मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत आहेत. गावी सुट्टीवर आल्यानंतर प्रज्वल रुपनूर यांचा विवाह झाला. विवाहानंतर अवघ्या पंधरा दिवसातच त्यांना ऑपरेशन सिंदूर युद्धासाठी सांगावा आला. शनिवारी मिरजेतून दुपारी एक वाजता गुजरात सीमेवरील भुज या ठिकाणी ते रवाना झाले. पत्नी, आई, चुलती, आजी यासह संपूर्ण परिवाराने मोठ्या अभिमानाने आपल्या या देशसेवकाला ऑपरेशन सिंदूर युद्धासाठी प्रोत्साहन देत मोठ्या आत्मविश्वासाने आणि भरल्या अंतकरणाने साश्रूनयनांनी निरोप दिला.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2025/05/VID_20250510_122533.mp4
https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2025/05/VID_20250510_130006.mp4

यावेळी प्रज्वल रूपनूर यांना निरोप देण्यासाठी टाकळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुलेमान मुजावर, छायाचित्रकार अशोक चौगुले यांच्यासह प्रज्वल रुपनूर यांचा मित्रपरिवार तसेच गोपनीय माहिती संशोधन संस्थेचे चेअरमन डॉ. संकेतराज बने व गोपनीय खबऱ्या लाईव्हची टीम उपस्थित होती.

प्रज्वल रुपनूर यांचे आजोबा कै. भूपाल गुंडाप्पा रुपनूर यांनी देशसेवा केली. वडील हिम्मतराव भुपाल रुपनूर , चुलते गोरख भुपाल रुपनूर, भाऊ प्रमिल हिम्मतराव रुपनूर याप्रमाणे तिसरी पिढी भारतीय सैन्यदलात देशसेवा करत आहे.

Previous Post

७ लाखांच्या बदल्यात २४ लाखांची व्याज वसुली, तिघे खासगी सावकार अटकेत

Next Post

ब्रेकिंग | अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांची प्रकृती बिघडली; मुंबईतील सेफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांची प्रकृती बिघडली; मुंबईतील सेफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

ब्रेकिंग | अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांची प्रकृती बिघडली; मुंबईतील सेफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group