• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

७ लाखांच्या बदल्यात २४ लाखांची व्याज वसुली, तिघे खासगी सावकार अटकेत

Admin by Admin
May 9, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
७ लाखांच्या बदल्यात २४ लाखांची व्याज वसुली, तिघे खासगी सावकार अटकेत
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हातकणंगले प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

आळते (ता. हातकणंगले) येथील तिघा खासगी सावकारांनी मौजे मुडशिंगी येथील औषधी दुकानदाराला व्याजाने दिलेल्या ७ लाखांचे २४ लाख वसूल केले. खासगी सावकाराने परत १७ लाखांची मागणी केल्याने औषधी दुकानदार उत्तम तानाजी पाटील (रा.मुडशिंगी ता. हातकणंगले) यांनी विजय आप्पासो चव्हाण (वय ३९), विष्णू आण्णासो जाधव (४५ ), संतोष बाळू रोहिले (४२, सर्व रा. आळते ता. हातकणंगले) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांच्या मुसक्या आवळल्या.

उत्तम पाटील यांचे मौजे मुडशिंगी येथील गणेश मंदिराजवळ औषधी विक्रीचे दुकान आहे. त्यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये व्यवसाय आणि वैयक्तिक कारणासाठी आळते येथील विजय चव्हाण, विष्णू जाधव आणि संतोष रोहिले यांच्याकडून प्रति माहिना ३ टक्के व्याजदराने ७ लाख रुपये घेतले होते. उत्तम पाटील यांनी वेळाेवेळी व्याज आणि घेतलेली मुद्दल अशी २४ लाख रुपयांची परतफेड केली.

तरीही या खासगी सावकारांनी उत्तम पाटील यांच्याकडे आणखी १७ लाख देण्यासाठी तगादा लावला होता. पाटील यांच्यासह कुुटुंबाला मानसिक त्रास दिला जात होता. खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून पाटील यांनी त्यांच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विजय आप्पासो चव्हाण, विष्णू आण्णासो जाधव, संतोष बाळू रोहिले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भिशीचे पेव

तालुक्यातील गावागावांमध्ये लिलाव भिशीचे पेव फुटले आहे. १ लाखाच्या रकमेला लिलाव भिशीमध्ये ३० हजारापर्यंत व्याज आकारणी करून भिशीचालक सर्वसामान्यांची लूट करीत आहेत. भिशीच्या नावाखाली व्याजाचा गोरखधंदा जोरात सुरू आहे.

Previous Post

ब्रेकिंग | राज्य पोलीस दलातील सहा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या; दोघांना पोलीस महासंचालकपदी बढती

Next Post

खंडेराजुरीतील प्रज्वल रूपनूर युद्धासाठी रवाना, तीन पिढ्या देशसेवेसाठी कार्यरत ..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खंडेराजुरीतील प्रज्वल रूपनूर युद्धासाठी रवाना, तीन पिढ्या देशसेवेसाठी कार्यरत ..!

खंडेराजुरीतील प्रज्वल रूपनूर युद्धासाठी रवाना, तीन पिढ्या देशसेवेसाठी कार्यरत ..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group