• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांची प्रकृती बिघडली; मुंबईतील सेफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Admin by Admin
May 12, 2025
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांची प्रकृती बिघडली; मुंबईतील सेफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री झिरवळ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईतील (Mumbai) सेफी रुग्णालयात मंत्री झिरवाळ यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती झिरवळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरहरी झिरवळ हे किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर मागील 8 दिवसांपासून उपचार सुरू आहे. परिणामी त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. अशातच आज अचानक अस्वस्थ वाटल्याने ते पुन्हा मुंबईतील सेफी रुग्णालयात दाखल झाले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती झिरवळ यांच्या कार्यालयाने दिली आहे. मात्र अचानक मंत्री नरहरी झिरवळांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे कार्यकर्ते आणि पदाकारी काहिसे चिंतेत असल्याचे ही बघायला मिळाले आहे.

गावचा सरपंच ते मंत्री, नरहरी झिरवळांची झेप

नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिंडोरी विधानसभेचे आमदार आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत. नरहरी झिरवाळ यांचा जन्म 1 जून 1959 झाला. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे नरहरी झिरवाळ यांचे गाव. त्यांनी 12 वी नंतर कला शाखेत शिक्षण घेतले आहे. कुटुंबातील परिस्थिती हलाखीची असताना उदरनिर्वाह करण्यासाठी बांधकामामध्ये बिगारीचे काम त्यांनी केले होते. दिंडोरी तहसील कार्यालयात लिपीक म्हणूनही त्यांनी काम केले. मात्र त्या कामात त्यांचे मन न रमल्याने त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर गावात शेती व इतर कामे करताना सामाजिक उपक्रमात त्यांनी सक्रिय घेतला.

जनता दलाचे माजी खासदार कै. हरिभाऊ महाले यांच्यासोबत राहून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर गावच्या राजकारणात प्रवेश करून ते वनारे गावाचे सरपंच झाले. सरपंचपदानंतर जनता दलातून पंचायत समितीचे सदस्य व राष्ट्रीय काँग्रेसमधून ते उपसभापती झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2001 साली जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याची संधी त्यांना मिळाली. गावचा सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा उपाध्यक्ष अशी झेप घेणारे नरहरी झिरवाळ यांनी अलिकडेच महायुती सरकारमध्ये अन्न आणि औषध प्रशासन मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे.

Previous Post

खंडेराजुरीतील प्रज्वल रूपनूर युद्धासाठी रवाना, तीन पिढ्या देशसेवेसाठी कार्यरत ..!

Next Post

सांगली भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक,शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक,शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग

सांगली भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक,शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group