• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | कलेक्टर – पोलिस दखल घेत नाहीत, पेन्शनच्या आमिषाने वृध्द विधवेची १७ एकर जमीन लाटली, आमदाराच्या फार्महाऊस मॅनेजरच्या नावे दस्त.?

Admin by Admin
May 9, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगलीत विधवा महिला लाभार्थी पेन्शन सुरू करून देतो, असे सांगत खरेदी पत्रावर अंगठ्याचे ठसे घेत फसवणूक करून वृध्द विधवेची सुमारे १७ एकर जमीन हडपल्याचा आरोप आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी येथील पडळकर कुटुंबीयांनी केला आहे.

खरेदी दस्त तत्काळ रद्द न केल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिला. जमिनीचा दस्त ज्यांच्या नावे केलेला आहे तो एका आमदारांच्या फॉर्महाऊसचा मॅनेजर आहे. राजकीय दबावामुळे दोषीवर कारवाई होत नाही, असाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असून दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

पडळकर कुटुंबीयांनी सांगितले की, वृध्द महिला श्रीमती विठाबाई बापू पडळकर यांच्या नावे आणि त्यांच्या कुटुंबांची आणेवारीतील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी येथे सुमारे १७ एकर जमीन होती. विठाबाई यांना विधवेची पेन्शन मिळवून देतो, असे सांगून गावचे पोलिस पाटील अमोल उत्तम पडळकर यांनी आटपाडी येथील नोंदणी कार्यालयात नेले, तेथे एका आमदाराच्या फॉर्महाऊसचे मॅनेजर असलेल्या कैलास मोतीराम वाघमारे यांच्या नावे खरेदीदस्त केला. या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर विठाबाईचे नातू राजेंद्र व किरण पडळकर यांच्यासह नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी आटपाडी पोलिसांत तक्रार दिली. मात्र राजकीय दबावामुळे कोणतीही दखल घेतली गेली नाही, उलट धमकी ही दिली जात आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली, मात्र अद्याप त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही तक्रारीची दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

Previous Post

ब्रेकिंग | सहा लाखांच्या बेदाण्यांची कुपवाड एमआयडीसीत चोरी

Next Post

ब्रेकिंग | मोहम्मदला रत्नागिरीत कपडे फाटूपर्यंत हाणले, म्हणाला.. ‘पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तानसाठी प्रार्थना करा’

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मोहम्मदला रत्नागिरीत कपडे फाटूपर्यंत हाणले, म्हणाला.. ‘पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तानसाठी प्रार्थना करा’

ब्रेकिंग | मोहम्मदला रत्नागिरीत कपडे फाटूपर्यंत हाणले, म्हणाला.. 'पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तानसाठी प्रार्थना करा'

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group