Friday, June 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मोहम्मदला रत्नागिरीत कपडे फाटूपर्यंत हाणले, म्हणाला.. ‘पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तानसाठी प्रार्थना करा’

Admin by Admin
May 9, 2025
in क्राईम, सामाजिक
0
ब्रेकिंग | मोहम्मदला रत्नागिरीत कपडे फाटूपर्यंत हाणले, म्हणाला.. ‘पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तानसाठी प्रार्थना करा’

 

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानविषयी प्रेम दाखवत स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला रत्नगिरीकरांनी चोप दिला. यात जखमी झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले.त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात (Ratnagiri Police) गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

तसेच तो ज्या आस्थापनेत कामाला होता तेथून त्याला काढून टाकण्यात आले आहे. महम्मद बद्रुद्दीन परकार (वय २१, मूळ केजीएम प्लाझा, गोवळकोट, चिपळूण, सध्या रा. महादेव नगर, रत्नागिरी) असे या संशयित तरुणाचे नाव आहे.

ही घटना बुधवारी (ता. ७) रात्री निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हल्ला करत दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. यानंतर महम्मद याने ‘पाकिस्तान जिंदाबाद, ‘पाकिस्तानसाठी प्रार्थना करा’ असे स्टेटस संत्याच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅप स्टेटसला ठेवले. यामुळे खळबळ उडाली.

रत्नागिरीकरांच्या ही गोष्ट लक्षात आली. हा तरुण एका प्रसिद्ध आस्थापनेत काम करतो. त्या आस्थापनेत जाऊन रत्नागिरीकरांनी माहिती घेतली असता, त्याला स्टेटसमुळे आदल्या दिवशीच कामावरून काढून टाकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रत्नागिरीकरांनी त्या तरुणाला शोधून चोप दिला. त्यानंतर त्याने ‘भारत माता की जय’ म्हटले.

दंगा काबू पथकाला पाचारण

रत्नागिरीकरांनी चोप दिल्यानंतर जखमी अवस्थेत तरुणाला पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने दंगा काबू पथकाला पाचारण केले होते. या पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयाचा ताबा घेतला. शहर पोलिस निरीक्षक शिवरेकर यांच्यासह पोलिस पथकही याठिकाणी दाखल झाले होते.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | कलेक्टर – पोलिस दखल घेत नाहीत, पेन्शनच्या आमिषाने वृध्द विधवेची १७ एकर जमीन लाटली, आमदाराच्या फार्महाऊस मॅनेजरच्या नावे दस्त.?

Next Post

ब्रेकिंग | राज्य पोलीस दलातील सहा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या; दोघांना पोलीस महासंचालकपदी बढती

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | राज्य पोलीस दलातील सहा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या; दोघांना पोलीस महासंचालकपदी बढती

ब्रेकिंग | राज्य पोलीस दलातील सहा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या; दोघांना पोलीस महासंचालकपदी बढती

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014