• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सहा लाखांच्या बेदाण्यांची कुपवाड एमआयडीसीत चोरी

Admin by Admin
May 9, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विशेष प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कुपवाड एमआयडीसी कानडवाडी रस्त्यालगत असलेल्या पवन अ‍ॅग्रोटेक गोदाम, मिरज एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या अशोका बार शेजारील राजयोग ओवरसिस गोदाम, सावळी ते कानडवाडी रस्त्यालगत असलेल्या सांगली मार्केट कमिटीच्या समोरील बाजूस असलेल्या अंजनी ट्रेडर्स गोदाम तसेच दादू वॉशिंग सेंटर गोदाम अशा चारही गोदामांतील एकूण 6 लाख 79 हजार 500 रुपये किमतीच्या बेदाणे बॉक्सची चोरट्यांनी वेगवेगळ्या दिवशी चोरी केल्याची तक्रार कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : नितीन कटारिया (रा. माधवनगर रोड, कलानगर, सांगली) यांचे कुपवाड एमआयडीसी ते कानडवाडी रस्त्यालगत पवन अ‍ॅग्रोटेक गोदाम आहे. चोरट्यांनी दि. 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गोदामाचा लोखंडी पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. गोदामातील 2 लाख 55 हजार 750 रुपये किमतीचे वेगवेगळ्या बेदाण्यांच्या बॉक्सची चोरी केली आहे. राजयोग ओवरसिस गोदामाच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचे लोखंडी शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. गोदामातील 2 लाख 92 हजार 500 रुपये किमतीचे वेगवेगळे बेदाण्यांचे बॉक्स चोरी केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

सावळी ते कानडवाडी रस्त्यालगत असलेल्या सांगली मार्केट कमिटीच्या समोरील अंजनी ट्रेडर्स या गोदामाच्या गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी गोदामातील 63 हजार 750 रुपयांच्या बेदाणे बॉक्सची चोरी केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तसेच शेजारील दादू वॉशिंग सेंटर मधील दि. 15 एप्रिल ते 16 एप्रिल 2025 या कालावधीत चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून गोदामातील 67 हजार 500रुपये किमतीच्या बेदाण्यांची चोरी केल्याची तक्रार कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिस तपास करीत आहेत.

Previous Post

लग्नाचे आमिषाने तरुणीवर बलात्कार

Next Post

सांगली ब्रेकिंग | कलेक्टर – पोलिस दखल घेत नाहीत, पेन्शनच्या आमिषाने वृध्द विधवेची १७ एकर जमीन लाटली, आमदाराच्या फार्महाऊस मॅनेजरच्या नावे दस्त.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

सांगली ब्रेकिंग | कलेक्टर - पोलिस दखल घेत नाहीत, पेन्शनच्या आमिषाने वृध्द विधवेची १७ एकर जमीन लाटली, आमदाराच्या फार्महाऊस मॅनेजरच्या नावे दस्त.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group