• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लग्नाचे आमिषाने तरुणीवर बलात्कार

Admin by Admin
May 9, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
लग्नाचे आमिषाने तरुणीवर बलात्कार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

इन्स्टाग्रामवरून ओळख करून लग्नाचे आमिष दाखवत सांगलीतील तरुणीवर बलात्कार करून 12 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी संशयित ऋषिकेश ब्रह्मदेव माळी (रा. वकील वस्ती, इंदापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पीडिता सांगलीत खासगी नोकरी करते. संशयित माळी याच्याशी त्यांची जून 2023 मध्ये इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. त्यानंतर माळी याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून त्याने तिच्याकडून 10 लाख 28 हजार 698 रुपये व 2 लाख 71 हजार 302 रुपयांचे सोन्याचे दागिने असा 13 लाख रुपयांचा ऐवज घेतला.

माळी याने पीडितेला लग्न करणार असल्याचे सांगून धामणीजवळील हॉस्पिटलशेजारी असलेल्या शेतात, धामणीत रस्त्याकडेला शेतात तसेच तासगाव येथील बसस्थानकाजवळील लॉजवर शारीरिक संबंध ठेवले. जानेवारी 2025 पर्यंत माळी याने पीडितेशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लग्न करणे टाळले. पीडितेने याबाबत त्याला वारंवार विचारणा केली. तसेच घेतलेल्या पैशाची मागणी केल्यानंतर 13 लाख रुपयांपैकी केवळ एक लाख रुपये परत केले. उर्वरित बारा लाख रुपये अद्याप दिले नाहीत. माळी याने विश्वासघात केल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार माळी याच्याविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

सरळसेवा भरतीमधील दहा टक्के पदे कोतवालांच्या वारसदारांसाठी

Next Post

ब्रेकिंग | सहा लाखांच्या बेदाण्यांची कुपवाड एमआयडीसीत चोरी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | सहा लाखांच्या बेदाण्यांची कुपवाड एमआयडीसीत चोरी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group