• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | मनसे आक्रमक ; क्लब, कॅसिनो, जुगार अड्डे फोडण्याचा इशारा : अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना निवेदन

Admin by Admin
May 7, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | मनसे आक्रमक ; क्लब, कॅसिनो, जुगार अड्डे फोडण्याचा इशारा : अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना निवेदन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज शहर व परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला असून अती तातडीने कारवाई करीत पायबंद घालावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मिरज शहर व तालुका पदाधिकाऱ्यांकडून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मिरज शहर व तालुका परिसरात मटका, जुगार, क्लब, कॅसिनो व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात दिमाखात, खुलेआम सुरू आहेत. यामध्ये अल्पवयीन व तरुणवर्ग अक्षरशः बरबाद झाला आहे. कुटुंब उध्वस्त होत आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी मनसेने इशारा दिलाय.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2025/05/VID_20250507_131405.mp4
https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2025/05/VID_20250507_131527.mp4

अवैध धंदे बंद करण्याऐवजी आणि त्यावर कठोर कारवाई न करता त्यास पोलिस प्रशासनाकडून मूक संमती दिली जात आहे. पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे अवैध धंद्यांचे अड्डे उध्वस्त केले पाहिजेत. पोलिसांकडून काही दिवसांत असे न झाल्यास मिरज मार्केट परिसरात मोठ्या एलइडी स्क्रीनवर ‘लाव रे तो व्हिडिओ ‘ या मनसेच्या बहुचर्चित स्टाईलने मिरजकर नागरिकांना चित्रफितीद्वारे हा सर्व प्रकार दाखवण्यात येईल. यामध्ये मिरज शहर व परिसरात सुरू असलेल्या अड्ड्यांची व अवैध धंदे याची सविस्तर ठिकाणासहीत माहिती देण्यात आली आहे.

शिवाय, पोलिसांनी याला पायबंद घातला नाही तर जागोजागी सुरू असणाऱ्या अवैध धंद्याचे अड्डे मनसैनिक उधळून लावतील. असा इशारा मनसेचे शहर पदाधिकारी विठ्ठल शिंगाडे व तालुका अध्यक्ष प्रकाश साळुंखे यांनी दिला आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | भारताला जशास तसं उत्तर द्या, हल्ल्याचा बदला घ्या… पाकची वल्गना सुरूच, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार

Next Post

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; व्हाईट नाइट कॉर्प्सकडून श्रद्धांजली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; व्हाईट नाइट कॉर्प्सकडून श्रद्धांजली

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; व्हाईट नाइट कॉर्प्सकडून श्रद्धांजली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group