खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा (Operation Sindoor) धसका घेतलेल्या पाकिस्तानमध्ये आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. भारताला जशास तसं उत्तर देण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी तिथल्या लष्कराने पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्याकडे केली.
त्यानंतर पाकिस्तानी लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. या संबंधी पाकिस्तान सरकारकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं.
भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तान हादरला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा बैठक घेतली. त्यानंतर लष्कराला कारवाईचे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं. दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली.
भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
दरम्यान, पाकिस्तानमधील हल्ल्यामध्ये दहशतवादी ठार झाल्यानंतर तिथल्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मुरीदकेमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसांठी नमाज ए जनाजाचे आयोजन करण्यात आलं. मुरीदके फुटबॉल स्टेडिअममध्ये पाकिस्तानी नागरिक मोठ्या संख्येने जमले. भारताच्या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी केली जात आहे.
कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा करण्यात आला आहे. या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ शतवादी भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला. रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही यात समावेश आहे. तर अझहरचा भाऊ रौफ असगरच्या भावाच्या पत्नीचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. रौफ असगर हा भारतातील मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.
भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक? (India Air Strike On Pakistan)
1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर
2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर
3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर
4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी
5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर
6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.
7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर
8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर
9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर

