• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जप्त केलेली वाहने दंडात्मक रक्कम वसुल न करता दिली सोडून…

तहसीलदार जमदाडे यांच्यावर गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करण्यात यावे - दादासाहेब चव्हाण

Admin by Admin
May 11, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तलाठी दिलीप चौरेंवर कारवाई होणार की आरपीआय आंदोलन करणार..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

दहिवडी /फलटण ते म्हासुर्णे या राज्य महामार्गाचे काम करणारी राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची अवैध मुरूम व दगड उत्खनन प्रकरणी दंडात्मक कारवाई करून वाहतूक करणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली होती. परंतु खटाव तालुक्याचे तहसीलदार यांनी दंडात्मक रक्कम वसूल न करता कंपनीशी अर्थपूर्ण संबंध ठेवत बेकायदेशीर वाहने तहसीलदार या पदाचा दुरुपयोग करून सोडून दिल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून तहसीलदार किरण जमदाडे यांच्यावर महसूल प्रशासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करून कायमचे सेवेतून निलंबित करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

अन्यथा दिनांक २०/०५/ २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी दहिवडी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय दहिवडी येथे निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदनामध्ये असे म्हटले आहे की गेल्या दोन वर्षापासून फलटण ते मासुरणे या राज्य महामार्गाचे काम राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत असताना मौजे गोपुज ता. खटाव गट नं.८४६ मधून परवाण्याच्या नावाखाली पर्यावरण विभागाची कोणत्याही प्रकारचे परवानगी नसताना मोठ्या प्रमाणामध्ये भूसुरुंग स्पोट घडवत लाखो ब्रास मुरूम व दगड याचे अवैध उत्खनन केल्याचे लेखी निवेदन व तक्रारी दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने तहसीलदार वडूज खटाव यांनी संबंधित कंपनीला अवैध उत्खनन प्रकरणी लेखी आदेश काढत.६,४०४१६०० / -१,५४,८०००० कोटी रुपये दंड व इतर दंड आकारण्यात आला होता. तसेच संबंधित कंपनीची वाहतूक करणारी यंत्रसामग्री दिनांक २५/१/२०२२ रोजी लेखी आदेश काढत नऊ वाहने जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या वाहनांचे नं खालीलप्रमाणे होते.१) mh12 RK 2677 (2) mh 12 nd 1209 ( 3)mh 12 sx 1163 (4)mh12 qw 9817 (5)mh12 9814 (6) mh12 fs 6257(7) mh12sf 6837 (8)mh12sf 6826 (9)mh12 sk 0881 ही वाहने जप्त करून औंध पोलीस स्टेशन येथे जमा करून प्लांट सील करून कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.

परंतु संबंधित तहसीलदार किरण जमदाडे यांनी तहसीलदार या पदाचा दुरुपयोग करत कंपनीशी अर्थपूर्ण संबंध ठेवत महसूल प्रशासनाची करून दंडात्मक रक्कम वसूल न करता सदर कंपनीची वाहने सोडून दिली असल्याने साप प्रकार गंभीर व बेकायदेशीर व महसूल प्रशासनाची फसवणूक केली जात असल्याने तात्काळ चौकशी करून किरण जमदाडे व इतर महसूल अधिकार्‍यांसह संबंधित कंपनीवर महसूल प्रशासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करून महसूल अधिकाऱ्यांना कायमचे सेवेतून निलंबित करून कंपनीकडून दंडात्मक रक्कम वसूल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक 20/5/ 2022 रोजी उपविभागीय अधिकारी दहिवडी मान यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आर आर पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी दिला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल न झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार महसूल प्रशासन राहील तरी प्रशासनाने या निवेदनाची वेळीच दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी..

Previous Post

आरोग्यभरती गट ‘ड’ वर्गाची परीक्षा पुन्हा होणार ….?

Next Post

विधायक कार्यातून नेतृत्व विकसित करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विधायक कार्यातून नेतृत्व विकसित करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

विधायक कार्यातून नेतृत्व विकसित करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group