• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आरोग्यभरती गट ‘ड’ वर्गाची परीक्षा पुन्हा होणार ….?

Admin by Admin
May 11, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय
1 min read
0
आरोग्यभरती गट ‘ड’ वर्गाची परीक्षा पुन्हा होणार ….?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे: राज्यात आरोग्य भरती परीक्षेच्या घोटाळ्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. आरोग्य भरतीचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला होता. आरोग्य भरतीच्या गट ड वर्गाचा पेपर व्हायरल झाला होता, त्यामुळे आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे.

राज्यात मागच्या काळात आरोग्य भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहेत. आरोग्य भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात विधानसभेत आश्वासन दिले होते. पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भत आदेश दिले होते.

पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर पूर्ण व्हायरल झाला होता, त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहोत असे राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा झाली आहे. दोन्ही ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ. मंत्री मंडळाचा निर्णय आहे त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यात झाला असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

कोरोनामुळे राज्यात दोन वर्ष स्पर्धा परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणार उमेदवार निराशेत होते. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण कमी होवू लागले आणि परीक्षा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु टीईटी परीक्षा, आरोग्य भरती, म्हाडा या परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचे पेपेर फुटल्याचे समोर आले. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी मोठे रॅकेट सर्वांसमोर आले. त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले होते. राज्याच्या विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला होता.

Previous Post

कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षिसासाठी पुढील वर्षापासून 1 कोटीचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

जप्त केलेली वाहने दंडात्मक रक्कम वसुल न करता दिली सोडून…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तलाठी दिलीप चौरेंवर कारवाई होणार की आरपीआय आंदोलन करणार..?

जप्त केलेली वाहने दंडात्मक रक्कम वसुल न करता दिली सोडून...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group