खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
पुण्याच्या नवले ब्रिजवर अपघाताची मालिका अजूनही सुरुच आहे. आज पुन्हा ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने तीन वाहनांना धडक बसल्याची घटना नवले पुलावर घडली आहे. घटनेत तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे.

