• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग ! पदोन्नती नाकारलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई 

Admin by Admin
May 3, 2025
in क्राईम
1 min read
0
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

पोलिस दलात गेल्या काही वर्षांत अनेक अधिकाऱ्यांनी पदोन्नती नाकारली आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात आता कारवाई करण्याचे आदेश आस्थापनाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. सुखविंदरसिंह यांनी काढले आहेत.

२०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांत पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त अशा तब्बल ७५ जणांनी पदोन्नती नाकारली आहे. त्यामुळे पदोन्नती नाकारलेल्या अशा अधिकाऱ्यांना पुढील पदोन्नतीसाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पोलिस दलात अनेक अधिकारी वर्षानुवर्ष आहेत त्याच जिल्ह्यात राहतात. त्यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्यात येतात तर काही जण पदोन्नती नाकारण्याच्या वाटेने जात आहेत. तेच ठिकाण टिकवण्याचा प्रयत्न करतात. पदोन्नती नाकारणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर काय कारवाई करावी, याबाबत २०१०, २०१६ आणि २०१९ ला शासनाने आदेश काढून कार्यवाहीबाबत आदेश दिले होते. त्यात गेल्या दोन वर्षांत पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त अशा ७५ जणांनी पदोन्नती नाकारली आहे. त्यामध्ये पुणे शहर, छत्रपती संभाजीनगर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, बृहन्मुंबई, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक ग्रामीण, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर ग्रामीण, सांगली येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पदोन्नती नाकारणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे.

त्यात वरच्या संवर्गात पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर अथवा तत्पूर्वीच एखाद्या कर्मचाऱ्याने पदोन्नतीचे पद स्वीकारण्यास नकार दर्शवल्यास त्याचे नाव पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या निवड यादीतून काढून टाकण्यात येणार आहे. पुढील दोन वर्ष होणाऱ्या निवड सूचीमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षीच्या पदोन्नतीसाठी पात्रता येणार आहे. ज्यांनी कायमस्वरूपी पदोन्नती नाकारली आहे, त्यांचा पुढील कोणत्याही निवड सूचीमध्ये समावेश केला जाणार नाही.

Previous Post

ब्रेकिंग | नवले ब्रीजजवळ ट्रेलरचा ब्रेक फेल; तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

Next Post

धक्कादायक ब्रेकिंग! शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक ब्रेकिंग! शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी

धक्कादायक ब्रेकिंग! शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group