• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | महिलेची साडेचार लाखांची फसवणूक; सोशल मीडियाद्वारे ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली गंडा..!

Admin by Admin
May 1, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | महिलेची साडेचार लाखांची फसवणूक; सोशल मीडियाद्वारे ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली गंडा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून सांगलीतील एका महिलेची साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी समाज माध्यमांतून संपर्कात आलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रुकय्या तौफिक पटेल (बालाजीनगर, गेट क्र. ३ च्या समोर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा प्रकार ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रुकय्या पटेल या गृहिणी आहेत. ३० जानेवारी रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून मोबाईल कॉल आला. संबंधित व्यक्तीने रुकय्या यांना घरबसल्या नोकरी देण्याचे आमिष दाखविले. याकरिता काही रक्कम भरायला लागेल, असे सांगितले. परंतु रुकय्या यांनी ‘ऑनलाइन’ पैसे देणार नसल्याचे स्पष्ट केले. तेव्हा, संशयिताने त्यांना टेलिग्राम ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्या माध्यमातून काही लिंक पाठविल्या.

त्या माध्यमातून संशयिताने ‘ऑनलाइन’ पटेल यांच्या बॅंक खात्यातील ४ लाख ५० हजारांची रक्कम परस्पर काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यावर रुकय्या यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते’, शहाजी बापू पाटलांचे अजब लॉजिक

Next Post

सांगली ब्रेकिंग | ४० तोळे सोन्याची बॅग अगदी २ सेकंदात लंपास : सर्वत्र खळबळ .!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | ४० तोळे सोन्याची बॅग अगदी २ सेकंदात लंपास : सर्वत्र खळबळ .!

सांगली ब्रेकिंग | ४० तोळे सोन्याची बॅग अगदी २ सेकंदात लंपास : सर्वत्र खळबळ .!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group