• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | ४० तोळे सोन्याची बॅग अगदी २ सेकंदात लंपास : सर्वत्र खळबळ .!

Admin by Admin
May 2, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | ४० तोळे सोन्याची बॅग अगदी २ सेकंदात लंपास : सर्वत्र खळबळ .!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली शहरातील गजबजलेल्या कर्मवीर चौकाजवळील कर्मवीर पतसंस्थेत लाॅकरमध्ये दागिने ठेवण्यास आलेल्या धनचंद्र भाऊराव सकळे (वय ६५, रा. क्रांती क्लिनिकजवळ, सांगली) यांची तब्बल ४० तोळे सोन्याची बॅग चोरट्याने धूमस्टाईल लांबविली. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

सकळे हे पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी आहेत. कर्मवीर पतसंस्थेत ते खातेदार आहेत. संस्थेत त्यांनी दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी लाॅकर घेतला आहे. चार दिवसापूर्वी लग्नकार्यामुळे त्यांनी दागिने घरात आणले होते. त्यानंतर दागिने परत पतसंस्थेत ठेवण्यासाठी चालकाला घेऊन ते शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मोटारीतून बाहेर पडले. कर्मवीर पतसंस्थेच्या दारात चालकाने मोटार थांबविली.

मोटारीचा दरवाजा उघडून सकळे खाली उतरले. तेवढ्यात मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या हातातील बॅग हिसकावली. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात तो दुचाकीवरुन चौकातून शंभरफुटी रस्त्याकडे वेगाने निघाला. सकळे यांना क्षणभर काही समजले नाही. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक धावले. भरदिवसा ४० तोळ्याची बॅग लंपास केल्याचे समजताच सर्वांना धक्का बसला.

चोरट्याचा माग काढण्यासाठी पथके रवाना

विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला. उपअधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली. पतसंस्थेतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तपासणी केली. तेव्हा एकट्याच चोरट्याने मोटारीच्या मागून येऊन बॅग लंपास केल्याचे दिसून आले. चोरट्याचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने देखील घटनास्थळी येऊन माहिती घेतली.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | महिलेची साडेचार लाखांची फसवणूक; सोशल मीडियाद्वारे ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली गंडा..!

Next Post

सांगलीतील सर्वत्र खळबळ माजवणाऱ्या सोने चोरीचा ‘ग्राउंड झिरो’ रिपोर्ट : खबऱ्याची खबर पक्की..! ४० तोळे नव्हे इतक्या किमतींचे होते सोने.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीतील सर्वत्र खळबळ माजवणाऱ्या सोने चोरीचा ‘ग्राउंड झिरो’ रिपोर्ट : खबऱ्याची खबर पक्की..! ४० तोळे नव्हे इतक्या किमतींचे होते सोने.

सांगलीतील सर्वत्र खळबळ माजवणाऱ्या सोने चोरीचा 'ग्राउंड झिरो' रिपोर्ट : खबऱ्याची खबर पक्की..! ४० तोळे नव्हे इतक्या किमतींचे होते सोने.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group