• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

Admin by Admin
April 30, 2025
in क्राईम, मंत्रालय
1 min read
0
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत.

देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपद देण्यात आलं आहे. विवेक फळसाळकर हे आज 30 एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यांच्यानंतर आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा होती. याशिवाय देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. विवेक फणसाळकर यांनी 30 जून 2022 मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा स्वीकारली होती. देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

ते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षण करणारे महत्त्वाचे कार्यालय असलेल्या संयुक्त पोलीस आयुक्तांपैकी एक होते. याशिवाय त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख यांसारखी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासह शहरात नोंदवलेल्या अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात देवेन भारती सहभागी होते.

देवेन भारती हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2014 ते 2019 दरम्यान देवेन भारती यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलं. परंतु ऑक्टोबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने त्यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये (MSSC) बदली केली.

देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, मिड डे वृत्तपत्राचे पत्रकार जे. डे यांची हत्या या प्रकरणांचा तपास त्यांनी केला. राज्यात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचं जाळं नष्ट करण्यासाठीही ते ओळखले जातात.

महाविकास आघाडीच्या भाजप नेते हैदर आझम यांच्या पत्नीविरुद्ध एफआयआर नोंदवला नाही, असा आरोप करून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पोलीस तपासात याप्रकरणी कोणतेही पुरावे सापडले नाहीत. यात मुंबई गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचं नाव नव्हतं.

देवेन भारती यांचे दाऊद इब्राहिमशी संबंधित गुन्हेगारांशी संबंध असल्याचा आरोप गुन्हेगार विजय पलांडेनं केला होता. या आरोपांबाबत माजी राज्य पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी देवेन भारती यांच्याविरुद्ध चौकशी अहवाल दाखल केला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा चौकशी अहवाल फेटाळून लावला होता.

Previous Post

ब्रेकिंग | पोलिस निरीक्षकाकडून व्हॉट्ॲपवर अश्लील मॅसेज,छेडछाडीचा आरोप : महिला पोलिसाची तक्रार

Next Post

सांगली | शेतातील झाडावरच लिंबू, काळी बाहुली, दोरा अन् टाचण्या; सांगलीत नेमकं चाललंय तरी काय?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | शेतातील झाडावरच लिंबू, काळी बाहुली, दोरा अन् टाचण्या; सांगलीत नेमकं चाललंय तरी काय?

सांगली | शेतातील झाडावरच लिंबू, काळी बाहुली, दोरा अन् टाचण्या; सांगलीत नेमकं चाललंय तरी काय?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group