
- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
पोलिस मुख्यालयातील महिला अंमलदाराने पोलिस निरीक्षकावर (पीआय) व्हॉट्ॲपवर अश्लील मॅसेज केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. हा प्रकार ९ एप्रिलला घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

याप्रकरणी संबंधित पोलिस निरीक्षकांनी हा गुन्हा जाणीवपूर्वक दाखल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण देत चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली.

३४ वर्षीय महिला अंमलदाराची नेमणूक पोलिस मुख्यालयात आहे. ती ९ एप्रिलला रात्री घरी होती. यावेळी रात्री दहा वाजून २२ मिनिटे ते ११ वाजून २३ मिनिटे या कालावधित
पोलिस निरीक्षक अशोक भंडारी यांनी तिच्या व्हॉट्ॲपवर कॉल केले; तसेच मेसेजमध्ये त्यांनी स्वतःचा हाफ जॅकेट घातलेला फोटो पाठवून पीडित महिलेस लज्जा वाटेल असे कृत्य केले. या तक्रारीवरून पोलिस निरीक्षक भंडारी विरुद्ध गुन्हा नोंद झाला. पीएसआय केदार तपास करीत आहेत.
- निरीक्षक भंडारे यांच्याकडून खंडण
याप्रकरणी पोलिस निरीक्षक भंडारी म्हणाले, माझ्याकडून कुठलाही पाठलाग करण्याचा प्रकार झाला नाही. माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत. हा गुन्हा द्वेष भावना किंवा गैरसमजुतीतून दाखल करण्यात आला. पोलिस तपासात हे समोर येईलच.
- सांगलीतही महिला पोलिसाची विनयभंगाची तक्रार
सांगली पोलीस मुख्यालयातही विनयभंगाचा प्रकार दोन महिन्यांच्या कालावधीत घडला होता. महिला पोलिसाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार देत पोलिस मुख्यालयातील एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालत महिला पोलिसास निलंबित केले अन् ज्याच्याविरोधात तक्रार आहे, अशा पोलिस कर्मचाऱ्याची बदली करून प्रकरण शांत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.