• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | गोरक्षक संतापले, ५ वासरांचा मृत्यू तर ३१ वासरे जखमी : कत्तलीसाठी जनावरे नेताना पाठलाग चुकविला अन् वाहनाचा अपघात

Admin by Admin
April 30, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | गोरक्षक संतापले, ५ वासरांचा मृत्यू तर ३१ वासरे जखमी : कत्तलीसाठी जनावरे नेताना पाठलाग चुकविला अन् वाहनाचा अपघात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कत्तलीसाठी जनावरे नेत असताना गोरक्षकांचा पाठलाग चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनाचा अपघात होऊन पाच वासरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे सावळी येथे तासगाव फाट्यावर घडली.अपघातानंतर चालकाने पलायन केले. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, कर्नाटकातून बोलेरो पिकअप वाहनातून (एमएच १३ एएन ५८८६) कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. यामुळे गोरक्षक या वाहनांचा पाठलाग करत होते. ही जनावरे सोलापूरला नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. गोरक्षकांचा पाठलाग चुकविण्याच्या प्रयत्नात असताना बोलेरो पिकअपने समोरून जात असलेला मालट्रक (केए २७ बी ७७२५) यास धडक दिली. यामुळे पिकअप वाहन पलटी झाले. या अपघातात संकरित गायीच्या पाच वासरांचा जागीच मृत्यू झाला. तर ३१ वासरे जखमी झाली होती.

या अपघातानंतर चालकाने पलायन केले असून, जखमी वासरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहनात ३६ वासरांच्या तोंडाला चिकटपट्टी लाऊन दोरीने दाटीवाटीने वाहनांत ठेवण्यात आले होते. जनावरांना चारा पाणी न देता योग्य त्या वैद्यकीय अधिकारीकडून वाहतुकीचा परवाना न घेता या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याने पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

कु. ऐश्वर्या अशोकरावजी कांबळे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा : विविध क्षेत्रातून शुभेच्छा, दिग्गजांकडून आशीर्वाद..!

Next Post

ब्रेकिंग | पोलिस निरीक्षकाकडून व्हॉट्ॲपवर अश्लील मॅसेज,छेडछाडीचा आरोप : महिला पोलिसाची तक्रार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | पोलिस निरीक्षकाकडून व्हॉट्ॲपवर अश्लील मॅसेज,छेडछाडीचा आरोप : महिला पोलिसाची तक्रार

ब्रेकिंग | पोलिस निरीक्षकाकडून व्हॉट्ॲपवर अश्लील मॅसेज,छेडछाडीचा आरोप : महिला पोलिसाची तक्रार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group