खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे अध्यक्ष, गोरगरिबांचा आवाज, निराधारांचा आधार, बहुजननेते अशोकरावजी कांबळे यांच्या कन्या कु. ऐश्वर्या हिच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दि. २८ रोजी मिरज शहरातील बालगंधर्व नाट्यगृहात सप्तसुरांच्या मैफिलीसह, मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी ताटे यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शुभेच्छा देताना स्मृती पाटील म्हणाल्या, आजच्या परिस्थितीत मुलीचा जन्मदिन तोही इतक्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात खूप मोठा आनंद आहे. जसे आपल्या मुलींच्या आनंदासाठी हे करतोय, तसेच आपण त्यांच्या शिक्षणासाठी अग्रक्रमाने पुढाकार घेतला पाहिजे. मला खूप अभिमान वाटला असे म्हणत उपायुक्त सौ. पाटील यांनी कु. ऐश्वर्या हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बहारदार गीत – संगीत कार्यक्रमासोबत, स्वरांजली ऑर्केस्ट्रा (निःशुल्क) आयोजित केला होता. गीतकार व संगीतकारांनी मिरजकरांना अक्षरश: बेधुंद केले.

देशातील विविध राज्यातून आलेल्या तब्बल १६ पेक्षा जास्त नामवंत वाद्यवृंद कलाकार, गायक, संगीतकार यांच्या अनोख्या सादरीकरणाने अक्षरशः धुमाकूळ घातला.
मिरज शहर व परिसरातील रसिक, श्रोते आणि कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. ऐश्वर्या हिला आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी गर्दी दिसून आली.
याप्रसंगी, बहुजननेते अशोकरावजी कांबळे, माजी नगरसेवक पै. संजय मेंढे, साजिद पठाण, प्रा. प्रमोद इनामदार, अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा. अभिजित आठवले (सर), उपाध्यक्ष डॉ. रवीकुमार गवई, उपाध्यक्ष भास्कर जगताप, कार्याध्यक्ष अविनाश जकाते (सर), सचिव प्रभाकर नाईक, सहसचिव नितेश वाघमारे, प्रमोद वायदंडे, शब्बीर चिवेलकर, राम ऊर्फ चंद्रकांत कांबळे, दिनेश चव्हाण, संजय कांबळे, प्रमोद कांबळे, मिठु कांबळे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.

