• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जत तालुक्यातील शेकडोंचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश, तालुकाध्यक्ष पदी बसवराज पाटील यांची नियुक्ती

Admin by Admin
April 29, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
जत तालुक्यातील शेकडोंचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश, तालुकाध्यक्ष पदी बसवराज पाटील यांची नियुक्ती
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

जनसुराज्य पक्षाच्या जत तालुका अध्यक्षपदी बसवराज पाटील (एकुंडीकर) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. बसवराज पाटील हे एकुंडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्य केले आहेत, त्यांना गावगाड्याची सखोल जाण आणि राजकीय तसेच सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील जनसामान्यांचा आवाज बुलंद होईल, असा विश्वास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री, आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी व्यक्त केला आहे.

या निवडीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जत तालुक्यातील विविध गावांतील अनेक नवयुवक व कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी झटण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रसंगी बोलताना नुतन तालुका अध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले, “संस्कार! संकल्प!! सिध्दी!! या ब्रीदवाक्यानुसार आम्ही तालुक्यातील शेवटच्या माणसाच्या न्यायासाठी लढा उभारणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत आणि जनसुराज्य पक्षाचा झेंडा तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात फडकावणार आहोत,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला जिल्हातील पक्षाचे अनेक पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | मिरज रेल्वेस्थानक संवेदनशील.?पहलगाम हल्ल्यानंतर २४ एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा वाढली

Next Post

ब्रेकिंग | युवानेते समित कदम यांच्याकडून मंत्री शिवेंद्रराजेंना निवेदन : म्हणाले, ‘हे’ तातडीने होणे गरजेचे..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | युवानेते समित कदम यांच्याकडून मंत्री शिवेंद्रराजेंना निवेदन : म्हणाले, ‘हे’ तातडीने होणे गरजेचे..!

ब्रेकिंग | युवानेते समित कदम यांच्याकडून मंत्री शिवेंद्रराजेंना निवेदन : म्हणाले, 'हे' तातडीने होणे गरजेचे..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group