• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | मिरज रेल्वेस्थानक संवेदनशील.?पहलगाम हल्ल्यानंतर २४ एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा वाढली

Admin by Admin
April 29, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | मिरज रेल्वेस्थानक संवेदनशील.?पहलगाम हल्ल्यानंतर २४ एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा वाढली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून रेल्वेनेही सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केली आहे. पुणे विभागात धावणाऱ्या २४ एक्स्प्रेस रेल्वेमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवून अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबविल्या आहेत.

विशेषतः पुणे स्थानकाला संवेदनशील स्थानक म्हणून घोषित केले आहे. तेथे अतिरिक्त निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित स्थानकांची अनपेक्षित तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांच्या समन्वयाने स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. पुण्यासह मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर श्वानपथकांद्वारे तपासणी केली जात आहे. सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना शस्त्र बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे विभागातील सुमारे २४ महत्त्वाच्या मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एस्कॉर्टिंग व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा बलाचे निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रातील गाड्यांमध्ये गस्तीचे काम करत आहेत. संवेदनशील बाबीची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला दिली जात आहे. रात्रीच्या वेळी एक निरीक्षक नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. विविध स्थानकांवर व गाड्यांमध्ये साध्या वेशातील विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रवाशांकडून ‘रेल मदत’ या प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱ्या तक्रारींची नियमितपणे दखल घेतली जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिरज स्थानक संवेदनशील

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मिरज रेल्वेस्थानकही संवेदनशील आहे. या स्थानकात यापूर्वीही अनेकदा गुन्हेगारांची धरपकड झाली आहे. स्थानकाबाहेरील परिसरात अनेकदा गुन्हेगारी कारवाया, लुटमारी झाल्या आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणाही सतर्क आहे.

Previous Post

मिरज | भाजपच्या वतीने भगवान परशुराम व छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन 

Next Post

जत तालुक्यातील शेकडोंचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश, तालुकाध्यक्ष पदी बसवराज पाटील यांची नियुक्ती

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जत तालुक्यातील शेकडोंचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश, तालुकाध्यक्ष पदी बसवराज पाटील यांची नियुक्ती

जत तालुक्यातील शेकडोंचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश, तालुकाध्यक्ष पदी बसवराज पाटील यांची नियुक्ती

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group