• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत शिवजयंती उत्साहात साजरी : आ. खाडे यांनी दिल्या विविध मंडळांना भेटी

मिरज शहर झाले भगवे

Admin by Admin
April 29, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरजेत शिवजयंती उत्साहात साजरी : आ. खाडे यांनी दिल्या विविध मंडळांना भेटी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

मिरज शहरात प्रतिवर्षीप्रमाणे शिवजयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर भगवे झाले होते. सायंकाळी उशिरा शहरात शिवजयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी पालकमंत्री आ.डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी शहरातील विविध मंडळांना भेट देऊन छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

मंगळवारी सकाळपासूनच शहरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येत होता. मुख्य चौक आणि गल्लीबोळातून मंडळांनी शिवजयंती निमित्त भगवे ध्वज, भगव्या पताका लावल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी शिवप्रतिमा पूजनासाठी मांडव घालण्यात आले होते व पोवाडे लावण्यात आले होते. त्यामुळे शहरात चैतन्याचा माहोल निर्माण झाला होता.

संघटित हिंदू संघटनेच्या वतीने महाराणा प्रताप चौकात, हिंदू एकताच्या वतीने हिंदमाता चौकात, रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने मिरज रेल्वे स्थानकासमोरील आवारात, शिवकल्याण समितीच्या वतीने ब्राह्मणपुरी परिसरात, शिवाजी चौकात शिवतीर्थ समितीच्या वतीने भव्य प्रमाणात शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे किल्ला भाग, शिवनेरी चौक, स्फूर्ती चौक, मालगाव वेस, दिंडी वेस, पाटील हौद, शनिवार पेठ, बुधवार पेठ, गाडवे चौक, शास्त्री चौक, गांधी चौक, कर्मवीर भाऊराव चौक, जवाहर चौक अशा अनेक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

ब्राम्हणपुरी परिसरात शिवकल्याण मंडळाच्या वतीने शिवप्रतिमा पूजन व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे संयोजन राजू जाधव, सुधीर कुलकर्णी, राजू जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले होते.

हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदमाता चौकात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. दत्ता भोकरे, परशुराम चोरगे, शिवाजी दुधाळ, सोमनाथ गोटखिंडे, प्रकाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी आयोजन केले होते.

माजी पालकमंत्री व मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भगवान परशुराम व छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. खाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील विविध मंडल माजी पालकमंत्री आ.डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी भेटी देऊन छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप जिल्हा महामंत्रीमोहन वाटवे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, वैभव दादा नलवडे, जितेंद्र ढोले, माजी नगरसेवक निरंजन आवटी, भैय्या अखाडेकर, मिलिंद भिडे, जयगोंडा कोरे, अनिल हारगे, अनिल रसाळ, उमेश हारगे, अभिजित गौराजे, महेश फोंडे, सुमेध ठाणेदार, गजेंद्र कुल्लोळी, शशिकांत वाघमोडे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

सांगलीत जुगार अड्ड्यावर छापा

Next Post

मिरज | भाजपच्या वतीने भगवान परशुराम व छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन 

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | भाजपच्या वतीने भगवान परशुराम व छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन 

मिरज | भाजपच्या वतीने भगवान परशुराम व छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन 

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group