• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत जुगार अड्ड्यावर छापा

Admin by Admin
April 29, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

इनाम धामणी (ता. मिरज) येथील बत्तीस माग कारखान्याजवळ चालणाऱ्या तीनपानी जुगार अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतले असून दिग्विजय सुभाष श्रीरंबेकर (रा. मौजेडिग्रज), महेश जिन्नू बिरणे, अक्षय राजेंद्र भोसले, अच्युत गोपाळ नाईक, सुहास कृष्णा कोळी व सतीश महावीर पाटील (सर्व रा. इनामधामणी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सहा मोबाईल, ३ मोटारसायकली, रिक्षासह इतर साहित्य असा २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकातील पोलिस मिरज विभागात गस्तीवर होते. त्यावेळी इनामधामणी येथे बंद पडलेल्या माग कारखान्याजवळ असणाऱ्‍या सम्मेद पाटील यांच्या जुन्या घराच्या वरच्या मजल्यावर बेकायदेशीरपणे तीनपानी जुगार खेळला जात आहे, अशी माहिती पथकाला मिळाली.

त्यानुसार उपनिरीक्षक कुमार पाटील, अरुण औताडे, संकेत मगदूम, अतुल माने, श्रीधर बागडी, सुशिल मस्के, सुमित सूर्यवंशी, ऋतुराज होळकर यांनी इनाम धामणी येथे छापा टाकला. त्यावेळी संशयित मिळून आले. संशयितांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेण्यात आले. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस नोंद झाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | मांगले येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ५० ग्रामस्थ जखमी 

Next Post

मिरजेत शिवजयंती उत्साहात साजरी : आ. खाडे यांनी दिल्या विविध मंडळांना भेटी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत शिवजयंती उत्साहात साजरी : आ. खाडे यांनी दिल्या विविध मंडळांना भेटी

मिरजेत शिवजयंती उत्साहात साजरी : आ. खाडे यांनी दिल्या विविध मंडळांना भेटी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group