• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | मांगले येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ५० ग्रामस्थ जखमी 

Admin by Admin
April 29, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | मांगले येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ५० ग्रामस्थ जखमी 

striped angry wasp stuck a sharp thorn in the human skin

4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मांगले (जि. सांगली) : येथील गणेशनगर भागातील एका घरावर असलेल्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात ५० हून अधिक ग्रामस्थ जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात ग्रामस्थ, महिला व लहान मुलांचा समावेश आहे.

गावात जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. गणेशनगर येथील मुख्य गल्लीत खुदाई करून पाणी पुरवठ्याची नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्याला घरगुती पाण्याची कनेक्शन जोडण्याचे काम सुरू होते. पाइप इलेक्ट्रिक मशीनच्या साहाय्याने गरम करून कनेक्शन जोडणी सुरू असताना पाइप गरम करतेवेळी झालेल्या धुरामुळे जवळ असणाऱ्या इमारतीवरील मधाच्या पोळ्यावरील माशा उठल्या.

मधमाश्यांनी पाठ सोडली नाही

सुरुवातीला काम करणाऱ्या कामगारांना मधमाश्यांनी वेढले. कामगारांनी हल्ला होताच पळ काढला. मात्र, मधमाश्यांनी पाठ सोडली नाही. याचवेळी गल्लीत कशाचा दंगा सुरू झाला म्हणून काही ग्रामस्थ, महिला, मुले घरातून बाहेर आली. त्यावेळी मधमाश्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. रात्री उशिरापर्यंत या गल्लीतून येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांना मधमाश्यांनी चावा घेतला. नळ कनेक्शन जोडणारे प्रमुख गजानन नाडे जवळ असल्यामुळे त्यांना जास्त मधमाश्यांनी घेरले होते. त्यांच्या डोक्यात व इतर ठिकाणी मधमाश्यांनी हल्ला केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते.

Previous Post

ब्रेकिंग ! सांगलीतील ‘या’ नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत गुप्त बैठक; फोटो व्हायरल, शिवबंधन तोडणार?

Next Post

सांगलीत जुगार अड्ड्यावर छापा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

सांगलीत जुगार अड्ड्यावर छापा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group