• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग ! सांगलीतील ‘या’ नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत गुप्त बैठक; फोटो व्हायरल, शिवबंधन तोडणार?

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित

Admin by Admin
April 29, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग ! सांगलीतील ‘या’ नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत गुप्त बैठक; फोटो व्हायरल, शिवबंधन तोडणार?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करुन निवडणूक लढवणारा पैलवान म्हणजेच डबल केसरी चंद्रहार पाटील हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून पाटील हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांनी या चर्चांना फेटाळले होते. दरम्यान, चंद्रहार पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गुप्त बैठकीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच पंगतीत जेवल्याचीही माहिती समोर आली होती. या भेटीनंतर चंद्रहार पाटील हे ठाकरेंचं शिवबंधन तोडून शिंदे गटात जातील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, चंद्रहार पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या होत्या. मात्र, आता चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीची व्हिडीओ समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीत चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची बैठक झाली होती. या बैठकीला खासदार धैर्यशील माने हेदेखील उपस्थित होते. या तिघांमध्ये दिल्लीत चर्चा झाली. मात्र, या भेटीत नेमकं काय घडलं हे अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसातच पाटील एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या रामायणात चंद्रहार पाटील केंद्रस्थानी राहिले होते. अचानक राजकारणात एंट्री, थेट ‘मातोश्री’वर प्रवेश, उद्धव ठाकरे यांच्याशी थेट कनेक्ट, शिवसेनेकडून सन्मानाची वागणूक आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील सांगलीच्या उमेदवारीवरून पडलेली ठिणगी. यामुळे चंद्रहार पाटील ‘हेडलाईन’ बनले होते. पण आता तेच चंद्रहार पाटील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत.

  • विकासकामांसाठी सत्ता अनिवार्य

चंद्रहार पाटील यांनी आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले होते. उद्धवसाहेबांनी मला खूप साथ दिली असून मोठी ताकद दिली. ते मान्यच करावे लागेल. पण भविष्याचा विचार केल्यास क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रासाठी काम करण्यासाठी सरकारची गरज लागते. अस विधान चंद्रहार पाटील यांनी केलं होते.

Previous Post

कुपवाड ब्रेकिंग |एमआयडीसीत हाताची चार बोटं तुटली, गोपीकिसन सारडा मिल’ला न्यायालयाचा दणका, कामगाराला मिळाला न्याय..!

Next Post

सांगली ब्रेकिंग | मांगले येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ५० ग्रामस्थ जखमी 

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | मांगले येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ५० ग्रामस्थ जखमी 

सांगली ब्रेकिंग | मांगले येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ५० ग्रामस्थ जखमी 

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group