• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचे निधन

Admin by Admin
April 29, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचे निधन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पलूस तालुक्यातील कुंडल येथील भारती महेंद्र लाड यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या ५३ वर्षांच्या होत्या. काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या त्या कन्या होत्या.

भारती लाड यांच्यामागे पती रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, मुले ऋषिकेश आणि रोहन, भाऊ आमदार डॉ. विश्वजीत कदम असा परिवार आहे.

दरम्यान, कुंडल येथे हजारोंच्या उपस्थितीत भारती यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. १४ एप्रिल रोजी चक्कर आल्यामुळे भारती लाड यांना सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची किडनी निकामी झाल्याचे निदान झाले.

पलूस परिसरात अनेक संस्था उभारल्या

घरात राजकीय आणि सामाजिक वातावरण असले, तरी भारती या अतिशय साध्या आणि सामान्य लोकांत मिसळून असत. त्यांचा विवाह ३ मे १९९३ रोजी कुंडल (ता. पलूस) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी झाला. भारती यांच्या प्रयत्नातून भारती शुगर, डॉ. पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्थांचे जाळे पलूस परिसरात उभे राहिले.

Previous Post

जिल्हा पोलिस दलातील सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Next Post

मोठी ब्रेकिंग | वादग्रस्त फलक झळकले अन् सर्वत्र खळबळ..? प्रशासनही अलर्ट मोडवर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | वादग्रस्त फलक झळकले अन् सर्वत्र खळबळ..? प्रशासनही अलर्ट मोडवर..!

मोठी ब्रेकिंग | वादग्रस्त फलक झळकले अन् सर्वत्र खळबळ..? प्रशासनही अलर्ट मोडवर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group