• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिल्हा पोलिस दलातील सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Admin by Admin
April 29, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
जिल्हा पोलिस दलातील सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जिल्ह्यातील सहा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. मोटार परिवहन विभागातील सहायक फौजदार राजेंद्र पवार यांना अपघात न करता २० वर्षांची कारकीर्द उत्तम ठेवल्याबद्दल सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हवालदार अनिल कोळेकर यांनी म्हैसाळ येथील हत्याकांड प्रकरणातील तपासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. सेवेत १५ वर्षे उत्तम रेकॉर्ड ठेवल्याबद्दल इस्लामपूर ठाण्याचे हवालदार दीपक ठोंबरे, मिरज ग्रामीणचे हवालदार श्यामकुमार साळुंखे, विटा पोलिस ठाण्याचे हवालदार आनंदराव पाटील यांच्यासह पोलिस मुख्यालयातील राष्ट्रीय खेळाडू विकी जांगळे या सहा जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

राज्य पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी अशा ८०० जणांना सन्मानचिन्ह जाहीर केले. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सहा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाल्याबद्दल पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितू खोखर यांनी अभिनंदन केले. एक मे रोजी महाराष्ट्र दिनी सहा कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे.

Previous Post

मिरजकरांनो, साडेआठ वाजता बालगंधर्व नाट्यगृहात नक्की या..! काही वेळात सुरू होतेय.. सप्तसुरांची मैफील

Next Post

पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचे निधन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचे निधन

पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचे निधन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group