• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | वादग्रस्त फलक झळकले अन् सर्वत्र खळबळ..? प्रशासनही अलर्ट मोडवर..!

Admin by Admin
April 29, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | वादग्रस्त फलक झळकले अन् सर्वत्र खळबळ..? प्रशासनही अलर्ट मोडवर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

खरेदी कोणाकडून करायची याविषयीचे वादग्रस्त फलक आज कोल्हापूरमध्ये झळकले. हिंदू व्यापाऱ्यांकडून आवर्जून खरेदी करावी असा संदेश देणाऱ्या या फलकावर अल्पसंख्यांकांना लक्ष्य केल्याचे दिसते.नाव विचारूनच बाजारात खरेदी करा , अशा आशयाच्या फलकाची कोल्हापुरात चर्चा रंगली आहे.

जम्मू आणि काश्मीर राज्यातील पेहलगाम येथे २७ पर्यटकांवर गोळीबार करून अतिरेक्यांनी जीव मारले. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. कोल्हापूर शहरात हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना ठाकरे गट, मुस्लिम समाज , इंडिया आघाडी, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्ष -संघटनांकडून या हल्ल्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तर दुसरीकडे हिंदूंवरील या हल्ल्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागले आहेत. आज कोल्हापुरात सकल हिंदू समाजाने लावलेल्या फलकावरून चर्चेला वेगळा संदेश पेरण्याचा प्रयत्न झाला आहे.

‘धर्म विचारूनच मारले. त्यामुळे आता यापुढं तुम्ही किमान नाव विचारूनच मार्केट मध्ये सुद्धा खरेदी करा, अशा आशयाचा फलक कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले आहे. सकल हिंदू समाजाकडून हा फलक लावण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘छत्रपती संभाजी महाराजांना धर्म बदलला नाही म्हणून मारलं.. आणि आता सुद्धा आपल्या २७ हिंदू बांधवांना धर्म विचारून मारले गेले. त्यामुळे मार्केटमध्ये खरेदी करताना नाव विचारूनच करा, असा आशय असणारा हा फलक मध्यवर्ती जागेवर लावण्यात आला आहे. शंभर टक्के आर्थिक बहिष्कार टाका असाही संदेश याद्वारे देण्यात आला आहे. अशा या फलकाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

Previous Post

पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचे निधन

Next Post

ब्रेकिंग | आमदार खाडेंच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ..! मेंढे म्हणाले, ‘खाडे जे बोलले ते एकदम’…! वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | आमदार खाडेंच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ..! मेंढे म्हणाले, ‘खाडे जे बोलले ते एकदम’…! वाचा सविस्तर

ब्रेकिंग | आमदार खाडेंच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ..! मेंढे म्हणाले, 'खाडे जे बोलले ते एकदम'...! वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group