- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज मतदार संघात विधानसभा निवडणुकी दरम्यान बरीच खलबतं झाल्याचे आज एका कार्यक्रमात स्पष्ट झाले. मिरजेतील काँग्रेसला दारिद्र्य कोणामुळे आले..? असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर नक्कीच आज ही बातमी वाचून मिळेल. जर काँग्रेसचे पदाधिकारीच विरोधी पक्षाच्या उमेदवारांबरोबर मिलीभगत करत असतील तर कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम करून यश कसे मिळेल.
मिरज विधानसभा क्षेत्रासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यंदा दणका द्यायचाच हा पक्का ध्यास केला होता. परंतु, महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या मित्र पक्षांनी काँग्रेस नेत्यांवर विश्वास ठेवला आणि नेहमी प्रमाणे दगाफटका झाल्याचे पहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे यांनी आपला पक्ष बाजूला सोडून मला मदत केली, अशी स्पष्टोक्ती करीत आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आज गौप्यस्फोट केला.
मिरजेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये बोलवाड रस्त्यालगत असणाऱ्या मिरज ओढ्यावरील संरक्षण भिंतीच्या भूमिपूजन कामाच्या उद्घाटन समारंभात बोलताना आमदार सुरेश खाडे यांनी हा गौप्यस्फोट केला. यावेळी जेष्ठ नेते सुरेश आवटी, माजी नगरसेवक संजय मेंढे, करण जामदार, बबिता मेंढे, संभाजी मेंढे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरज शहरात बोलवाड रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला पावसाळ्यात पूर आल्यानंतर नागरी वस्तीत पाणी शिरत असल्यामुळे याठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यासाठी माजी नगरसेवक संजय मेंढे यांनी पाठपुरावा केला होता. माजी मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यासाठी जवळपास दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले.
आमदार खाडे यांनी केलेल्या गौप्यस्पोटानंतर काँग्रेस प्रेमी, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात एकच खळबळ उडाली आहे.


